अंबड औद्योगिक वसाहतीत अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:45 AM2018-04-03T00:45:54+5:302018-04-03T00:45:54+5:30

अंबड एमआयडीसीतील बहुसंख्य पथदीप बंद असून, अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने व लूटमारीच्या घटना वाढल्याने कामगारवर्गात दहशत पसरली आहे.

Ambad industrial estate dark | अंबड औद्योगिक वसाहतीत अंधार

अंबड औद्योगिक वसाहतीत अंधार

googlenewsNext

सिडको : अंबड एमआयडीसीतील बहुसंख्य पथदीप बंद असून, अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने व लूटमारीच्या घटना वाढल्याने कामगारवर्गात दहशत पसरली आहे. अंबड एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीपासून ते ग्लॅक्सो स्मिथ क्लाइन, लीअर, अल्फ इंजिनिरिंग, कोका-कोका आदी भागातील रस्त्यावरील पथदीपही बंद असून, कायम अंधार असतो. रात्री पाळी करून रात्री ११ नंतर सुटणाऱ्या कंपनी कामगारांना जीव मुठीत धरूनच घराकडे जावे लागते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोºया वाढल्या आहेत. भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढली आहे. संबंधित विभागाने परिसरातील पथदीप त्वरित सुरू करावे, अशी मागणी कामगारवर्गाकडून होत आहे. मेल्ट्रॉन ते गॅब्रिअल कंपनीदरम्यान कधीच पथदीप कायम बंद असतात.
भुरट्या चोºया वाढल्या
एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्याने भुरट्या चोºया वाढल्या आहेत. तरी परिसरात रात्री ११ च्या पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. परिसरातील मेल्ट्रॉन कंपनी बºयाच वर्षापासून बंद असून, तिची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी अंधारात येथून जाताना भीतीचे वातावरण असते. याच ठिकाणी भुरटे चोर रात्रपाळी करून जाणाºया कामगारांना गाठून लुटतात.

Web Title: Ambad industrial estate dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.