कसमादे परिसरात घुमणार ‘आग्या हो’चा गजर
कसमादे परिसरात घुमणार ‘आग्या हो’चा गजर

ठेंगोडा : आदिशक्तीच्या भक्तीचा जागर असलेल्या नवरात्र म्हणजेच घटस्थापना ते दसरा या नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रीतील जागर व गोंधळाच्या कार्यक्र माबरोबरच कसमादे भागात देवीची चक्रपूजा मोठ्या भक्तिभावाने करण्यात येते. त्यामुळे आज पाचव्या माळेपासून ते नवव्या माळेपर्यंत मोठ्या भक्तिभावाने कसमादेतील घराघरांत ‘आग्या हो’ चा जयघोष कानी पडणार आहे.
आदिशक्ती देवीला प्रसन्न करण्यासाठी पांरपरिक पद्धतीने चालत आलेल्या या चक्र पूजेच्या कार्यक्र मात नातेवाईक, इष्ट मंडळी व मित्रपरिवारास आंमत्रित करून पुरणपोळी भोजनाची मेजवानी देण्यात येते. सायंकाळी सात वाजता घराघरांत ही चक्रपूजेची सुरुवात होते. हे चक्र (रिंगण) मांडतानाच ‘आग्या हो विस रंग्या हो’ चा आवाज दिला जात असल्याने आज पाचव्या माळेपासून नवव्या माळेपर्यंत कसमादेत ‘आग्या हो’ चा गजर घुमणार आहे. (वार्ताहर)


Web Title: The alarm of 'Aiyya Ho' will move around Kasamade area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.