देशाच्या सीमा रक्षणासाठी वायुसेना सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:42 AM2018-09-29T01:42:31+5:302018-09-29T01:43:03+5:30

बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते.

 Air force capable of protecting the border of the country | देशाच्या सीमा रक्षणासाठी वायुसेना सक्षम

देशाच्या सीमा रक्षणासाठी वायुसेना सक्षम

googlenewsNext

नाशिक : बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते. अशाप्रकारची कोणतीही स्थिती भारत-पाक अथवा भारत चीन सीमेवर उद्भवली, तर भारतीय वायुसेना दोन्ही आघाड्या सांभाळण्यास सक्षम आहे. वायुसेनेची ही ताकद कायम अद्यावत ठेवण्यासाठी २९ एप्रिल १९७४ पासून अविरत कार्यरत असलेल्या ११ बेस रिपेअर डेपोत ५० टक्के मीग २९ विमानांचे अद्यावतीकरण पूर्ण झाले आहे, तर सुखोई ३० एमकेआय विमानाचे संपूर्ण ओव्हर्लिंग करून २४ एप्रिल २०१८ रोजी यशस्वी उड्डाणही करण्यात आल्याने वायुसेनेला आणखी बळ मिळाले असून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यास वायुसेना सक्षम असल्याचे ११ बीआरडीचे आॅफिसर एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.
भारतीय वायुसेनेच्या ८६व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२८ ) वायुसेनच्या ओझर येथील ११ बेस रिपेअर डेपोमध्ये प्रसारमाध्यमांना भारतीय वायुसेना व त्यांच्या कार्यपद्धतीची प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. यावेळी ११ बेस रिपेअर डेपोमध्ये सध्या सुरू असलेल्या मीग २९ व सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांची दुरुस्ती व देखभाल प्रक्रियेविषयी माहिती देतानाच लढाऊ विमानांच्या कार्यक्षमतेत व आयुर्मान वाढविण्यासाठी सुरू असलेल्या अपग्रेडेशन (अद्यावतीकरण) प्रक्रियेची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ओझर येथे २९ एप्रिल १९७३ बीआरडीची सुरुवात मीग २९ व सुखोई एमकेआय डेपो या नावाने झाल्यानंतर १ जानेवारी १९७५ला ११बेस रिपेअर डेपो असे नामकरण झालेल्या या देखभाल दुरुस्ती केंद्रात १०८८ पर्यंत एसयू सात विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. १९८३ ते ८८ पर्यंत मीग २१ व २८ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मीग २३ विमानांची देखभाल दुरुस्तीचीही व्यवस्था करण्यात आली. मे १९८८ मध्ये मीग २३ दुरुस्तीचे काम सुरू झालेय २४८ मीग २३ विमानांची संपूर्ण देखभाल दुरुस्ती केल्यानंतर मे २०१५ मध्ये सक्वॉर्डनमध्ये पाठविण्यात आले. मीग २९ विमानचे काम १९९६ मध्ये ११बीआरडीला मिळाल्यानंतर आतापर्यंत ५०टक्के विमानांचे अद्यावतीकरणही करण्यात आल्याने विमानांची क्षमता पूर्वीपासून दुपटीने वाढली असून, आयुर्मानही ४० वर्षांनी वाढले आहे. दरम्यान, लवकरच येथे मोठा कार्यक्रम होणार असल्याचे सांगताना ११ बीआरडीला आणखी वेगळे आणि आव्हानात्मक काम मिळण्याचे संकेतही समीर बोराडे यांनी दिले.
स्वावलंबनाकडे वाटचाल
११ बीआरडी येथे लढाऊ विमानांचे अंडर कॅरेज, गियर व्हील, सुखोई ३०च्या इजेक्शन सीट निर्मिती यशस्वीरीत्या केली असून, हे पाट केवळ ओझर येथेच तयार केले जातात. अशाप्रकारे विमानाचे पार्ट तयार करून वायुसेना स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.
कौशल्य विकासाला चालना
ओझर येथील ११ बीआरडीमध्ये लढाऊ विमानांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कौशल्य निपून मनुष्यबळाची आवश्यकता अहे. त्यासाठी बीआरडीमार्फत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंना विशेष कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणही देण्यात येत असून, विविध शालेय भेटींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासासाठी प्रयत्न केले जातात.
११ बीआरडीमध्ये सध्या मीग २९ आणि सुखोई ३० एमकेआय विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या ९० टक्के सुट्या भागांची निर्मिती देशातच होते. त्यामुळे विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भारत स्वयंपूर्ण होत असून, स्थानिक उद्योगांनाही काम मिळत आहे. ११ बीआरडीमुळे नाशिकमधील जवळपास ५० लहान-मोठ्या उद्योगांना विमानाचे लहान-मोठे वेगवेगळे सुट्टे भाग बनविण्याचे काम मिळत असल्याने स्थानिक उद्योग विकासालाही यामुळे चालना मिळण्यात मदत होते.
-समीर बोराडे, कमांडिंग आॅफिसर, ११ बीआरडी, ओझर

Web Title:  Air force capable of protecting the border of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.