उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत कृषी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 07:59 PM2019-06-15T19:59:32+5:302019-06-15T20:00:46+5:30

जायखेडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत एकलहरे ता. बागलाण येथे खरीप हंगामपूर्व तयारी बाबत परिसरातील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

 Agricultural Meeting under Advanced Agriculture Enrichment Agriculture Campaign | उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत कृषी बैठक

उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत कृषी बैठक

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

जायखेडा : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती अभियान अंतर्गत एकलहरे ता. बागलाण येथे खरीप हंगामपूर्व तयारी बाबत परिसरातील शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी सहाय्यक श्रीमती डी. ए. भामरे यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
खरीप हंगामातील पीक नियोजन, बीज प्रक्रि या महत्व, माती व पाणी परिक्षण, मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रण, कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण, दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे व्यवस्थापन, पीक विमा, किटकनाशक हाताळणी आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन शेतकºयांना माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच चंद्रसिंग सुर्यवंशी, उपसरपंच वसंत अहिरे, पोलीस पाटील योगेश खैरनार, ग्रा.पं. सदस्य रावसाहेब खैरनार, देविदास ठाकरे आदींसह दिलीप जगताप उपस्थित होते. स्वप्निल पगारे, दिलीप अहिरे, नारायण शेवाळे, रवींद्र अहिरे, पंकज खैरनार, बबलू नाडस्कर, प्रकाश जगताप, भगवान जगताप व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title:  Agricultural Meeting under Advanced Agriculture Enrichment Agriculture Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी