नद्याचे जल घेवून सप्तश्रुंग गडावर कवडीधारक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:24 PM2018-10-22T17:24:36+5:302018-10-22T17:25:22+5:30

कळवण- सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून, सप्तश्रृंगी गडाकडे येणारे रस्ते कावडीधारकांचे भगवे कपडे व पदयात्रेकरु ंच्या हातात असलेल्या देवीच्या झेंड्यांमुळे सपूर्ण परीसर भगवामय झाला आहे.

 After taking the water of the river, the coffers enter the Sapshurung fort | नद्याचे जल घेवून सप्तश्रुंग गडावर कवडीधारक दाखल

नद्याचे जल घेवून सप्तश्रुंग गडावर कवडीधारक दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारीकोजागरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) उत्सव व कावड यात्रा सप्तशृंग गडावर संपन्न होत आहे.यानिमित्तयेथेकावड यात्रा संपन्न होते. कोजागिरी पौर्णिमेला आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेस अभिषेक विधी करण्यासाठी हजारो कावडीधारक पूणे येथून मुळा नदीचे, साक्र ी, पिंपळन


कोजागरी: तृतीय पंथींचा आनंद मेळावा भरणार
कळवण-
सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून, सप्तश्रृंगी गडाकडे येणारे रस्ते कावडीधारकांचे भगवे कपडे व पदयात्रेकरु ंच्या हातात असलेल्या देवीच्या झेंड्यांमुळे सपूर्ण परीसर भगवामय झाला आहे.

दरम्यान कोजागिरीच्या पूर्वसंध्येस नवीबेज, कळवण व सप्तश्रृंगी गड व परीसरात कावडीधारक दाखल झाले आहेत. रस्त्याला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.कळवणकडून पहाटेपासून कावडीधारक सप्तशृंग गडाच्या दिशेने निघाले असून रस्ता गर्दीने ओसंडून वाहात असल्याने मार्गावरील वाहने संथ गतीने धावत होते. ठिकठिकाणी स्वयंसेवी मंडळतर्फे कावडीधारक व पदयात्रेकरूंना फराळ, दुध, नाष्टा, सरबत व पिण्याच्या पाण्याची सुविधा व रविवारी व सोमवारी रात्री महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
आज मंगळवारी सकाळी सातला पंचामृत महापूजा, दुपारी १२ वाजेपासून कावडीधारकांना गेटमधुन मंदीरात सोडण्यात येणार आहे. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत कावडीधारकांनी आणलेले पवित्र नदयांचे जल कावडीधारक स्वत: जलाभिषेकासाठी ठेवण्यात आलेल्या दहा ते पंधरा पिंपामध्ये ओतील व त्यानंतर ११ पुरोहित लाखो भाविकांच्या उपस्थितीत सप्तश्रृंगीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे व रात्री बारा वाजता महाआरती होणार आहे.
कोजागीरी उत्साहाचे भाविकांचे खास आकर्षन असलेल्या किन्नरांची दिक्षा कार्यक्र मा बरोबरच शेकडो किन्नरांच्या उपस्थितअसणारी छबिना मिरवणूक निघणार आहे. त्यादृष्टीन किन्नरांचे वेगवेगळे गट सप्तशृंग गडावर दाखल झाले असून काही गट मंगळवारी सकाळीसपर्यंत दाखल होतील. कावडीधारक व यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, निवास व इतर कार्यक्र मांसाठी श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टने तयारी पूर्ण केली असून भाविकांना प्रसादालयात सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोजागरीच्या पूर्वसंध्येस सप्तशृंग गडावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सोमवारी मध्यरात्रीपासून नांदुरी सप्तश्रृंगी रस्ता खाजगी वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याने कावडीधारकांची साहित्य असलले हजारो वाहाने तत्पूर्वीच सप्तशृंग गडावर दाखल झाल्याने सप्तशृंग गडावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री पासून नांदुरी - सप्तश्रृंगी गड या दरम्यान फक्त राज्य परीवहन महामंडाच्या बसेस वाहतूक करणार असल्याने एसटी बसेस भाविकांच्या वाहतूकीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.


कळवणमध्ये दर्शन-
उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो कवडीधारक कळवण शहरात दाखल होवून विश्रांती घेतात. कळवणच्या गांधी चौकातील चंद्रकांत उपासनी यांच्या श्री अंबिकामातेच्या चरणी हजारो कावडीधारक नतमस्तक होवून मनोभावे दर्शन घेतात,मंदिरात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेवून कवडीधारक सप्तश्रुंग गडाकडे मार्गस्थ होतात,कळवणमार्ग हजारो कवडीधारक व शेकडो वाहने मार्गस्थ झाले.

किन्नराचा आनंद मेळावा-
तृतीय पंथीयांंच्या शब्दाला शुभ मानले जाते ,त्याबद्दल त्यांना दान दिले जाते ,उपेक्षा ही मात्र त्यांच्या पाचवीला पुजलेली असते ,कोजागिरी पौर्णिमेला मात्र सप्तश्रुंगगडावर तृतीयपंथी देशाच्या व राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर येतात ,कोजागरीला तृतीयपंथींचा आनंद मेळावाच सप्तश्रुंग गडावर जणू भरतोे. सप्तश्रुंग गडावरील शिवालाय तलावावर स्नान केल्यानंतर तृतीय पंथीची गडावर मिरवणूक काढली जाते.विविध भागातील सर्व पंथाचे लोक एकत्र येवून पंथाच्या गुरूला गुरु प्रदक्षिणा अर्पण करतात गुरु कडून शिष्यांना दीक्षा देण्याचे काम कोजागिरी पौर्णिमेला गडावर तृतीय पंथींचा एक आगळावेगळा कार्यक्र म गडावर संपन्न होत असल्याने हा कार्यक्र म पाहण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देवीभक्त गर्दी करतात ,देशात कोजागिरी पौर्णिमेला तृतीय पंथीचे कर्नाटकातील यलमा देवी व महाराष्ट्रातील कळवण तालुक्यातील सप्तश्रुंग गडावर असे दोनच ठिकाणी आनंद मेळावे भरतात.

प्राचीन काळी सप्तश्रुंग गडावरील शिवालय तलावावर स्नान करण्यापूर्वी देवांच्या राण्यांनी देवांना सांगताना सांगितले की ,आमच्या स्नानाच्या वेळी येथे आम्हाला पुरु षाचीही उपस्थिती नको ,आणि स्रिया देखील नको त्यावेळी देवांनी यातून मार्ग काढण्यासाठी तृतीय पंथी वर्गाची निर्मिती केली अशी आख्यायिका सांगितली जाते तेव्हापासून आजतागायत हे देवांचे दूत तृतीय पंथी सप्तश्रुंग गडावर शिवालय तलावावर स्नान करण्यासाठी जमतात असे सांगितले जाते
 

Web Title:  After taking the water of the river, the coffers enter the Sapshurung fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.