अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर  द्वारकावरील ‘कॉर्नर’ मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:08 AM2017-11-12T01:08:29+5:302017-11-12T01:11:45+5:30

महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली  ‘यू-टर्न’ योजना सपशेल अयशस्वी ठरल्यानंतर, पोलिसांनी पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना सदर धार्मिक स्थळाजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आता धार्मिक स्थळ हटल्यानंतर रस्त्यातील वृक्ष आणि वनविभागाचे गुदाम हटविण्याची कार्यवाही महापालिकेला पार पाडावी लागणार असून, साडेचार एकर परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत गाळ्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान समोर आहे.

After breaking the unauthorized religious site, the 'corner' of Dwarka is free | अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर  द्वारकावरील ‘कॉर्नर’ मोकळा

अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर  द्वारकावरील ‘कॉर्नर’ मोकळा

Next
ठळक मुद्दे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत ‘यू-टर्न’ योजना सपशेल अयशस्वीअनधिकृत गाळ्यांचा प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान

नाशिक : महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, द्वारका सर्कलवरील अनधिकृत धार्मिक स्थळ जमीनदोस्त केल्यानंतर कॉर्नर मोकळा झाला असून, त्यामुळे नाशिक-पुणारोडवरून येणाºया वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मागील महिन्यात पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर राबविलेली  ‘यू-टर्न’ योजना सपशेल अयशस्वी ठरल्यानंतर, पोलिसांनी पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना सदर धार्मिक स्थळाजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्याचे निरीक्षण नोंदविले होते. आता धार्मिक स्थळ हटल्यानंतर रस्त्यातील वृक्ष आणि वनविभागाचे गुदाम हटविण्याची कार्यवाही महापालिकेला पार पाडावी लागणार असून, साडेचार एकर परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत गाळ्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान समोर आहे.  द्वारका सर्कलवरील नित्याची बनलेली वाहतूक कोंडी ही महापालिका आणि पोलीस यंत्रणेची मोठी डोकेदुखी ठरली आहे. पोलिसांनी मागील महिन्यात सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘यू-टर्न’चा प्रयोग राबविला होता. परंतु, वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी ती अधिकच वाढू लागल्याने काही तासांतच पोलिसांना ही योजना गुंडाळावी लागली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांच्या दालनात झालेल्या मोबॅलिटी सेलच्या बैठकीत पोलिसांच्या या ‘यू-टर्न’ योजनेच्या अपयशावर चर्चा झाली होती. त्यात वाहतूक शाखेच्या प्रतिनिधीने, पुण्याहून येणाºया अवजड वाहनांना मारुती मंदिराजवळ डावे वळण घेताना अडचणी आल्या. जोपर्यंत डाव्या वळणाच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी फुटू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. 
गाळेधारकांनाही हटविण्याचे आव्हान 
द्वारका सर्कललगत महापालिकेचा साडेचार एकर भूखंड असून, या भूखंडावर सुमारे ७५ व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने त्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट आहे. चार महिन्यांपूर्वी आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेत गाळेधारकांची बैठक आयुक्तांसमवेत घडवून आणली होती. त्यावेळी व्यावसायिकांनी महापालिकेने सदर जागेवर व्यापारी संकुल उभारल्यास त्याठिकाणी गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. परंतु, व्यावसायिकांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असल्याने सदर दाव्याचा निकाल लागेपर्यंत प्रतीक्षा करण्याची तयारी महापालिकेने ठेवल्याने गाळेधारकांची पंचाईत झाली. दरम्यान, आता गाळेधारकांचेही अतिक्रमण हटविण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असून, महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्यास द्वारका सर्कल आणखी मोकळा श्वास घेणार आहे.

Web Title: After breaking the unauthorized religious site, the 'corner' of Dwarka is free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.