भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:14 PM2018-05-08T22:14:03+5:302018-05-08T22:14:03+5:30

नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे.

After the Bhimashankar, the state is expanding in Kisubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary | भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु

भीमाशंकरनंतर कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु

googlenewsNext
ठळक मुद्देदेवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्राचा परिसर शेकरूंसाठी पोषकआदिवासी लोकसंस्कृती-निसर्ग प्रेमामुळे वन्यजीवांचे संवर्धन

नाशिक : कळसूबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात राज्यप्राणी शेकरूंची संख्या गेल्या वर्षापासून वाढत आहे. नाशिक वन्यजीव विभागाकडून या क्षेत्राच्या परिसरात गठित करण्यात आलेल्या ग्राम परिस्थितीकीय विकास समित्यांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. पंधरवड्यानंतर अभयारण्य क्षेत्रात ‘शेकरू’ची गणना शास्त्रोक्त पध्दतीने सुरू होणार आहे.


नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. यामध्ये प्रामुख्याने भंडारदराजवळील घाटघर, कोलटेंभे, रतनवाडी, कुमशेत, साम्रद भागासह राजूर वनपरिक्षेत्रातील कोठुळे, टोलारखिंड आदी परिसरातील दाट व उंचीवरील वृक्षसंपदेवर शेकरूचा अधिवास असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे व अमोल आडे यांनी सांगितले. मागील वर्षी झालेल्या गणनेमध्ये शेकरूंची संख्या समाधानकारक असल्याचे दिसून आले होते. महाबळेश्वर परिसरातील नैसर्गिक जैवविविधता व वृक्षसंपदेशी साम्य असलेल्या अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्राचा परिसर शेकरूंसाठी पोषक व सुरक्षित नैसर्गिक अधिवास असल्याचे सहायक वनसंरक्षक शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. या भागातील आदिवासी लोकसंस्कृती आणि निसर्ग प्रेमामुळे शेकरूसह अन्य वन्यजीवांचे संवर्धन होण्यास हातभार लागत आहे.

Web Title: After the Bhimashankar, the state is expanding in Kisubai-Harishchandragaad Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.