बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:42 AM2019-07-16T00:42:51+5:302019-07-16T00:43:08+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. भाजीपाला विक्रीनंतर प्रत्येक वक्कलवर आडते-व्यापारी १० जुड्या अतिरिक्त घेत होते.

 The addition of additional judges in the market committee should be canceled | बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत रद्द करावी

बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत रद्द करावी

googlenewsNext

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. भाजीपाला विक्रीनंतर प्रत्येक वक्कलवर आडते-व्यापारी १० जुड्या अतिरिक्त घेत होते. पण याबाबत वेळोवेळी शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला होता.
काही दिवस ही पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु आडतदार व व्यापाऱ्यांकडून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांची नाराजी व तक्रारींची दखल घेत शिवाजीराव कोठुळे, भाऊसाहेब गडाख व परिसरातील गावांमधील शेतकºयांनी याबाबत उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याबाबत उपनिबंधक सहकारी व पणन संस्था यांनी याची दखल घेत सदर १० अतिरिक्त जुड्या घेण्याची पद्धत बंद करण्याचे कळविले. तसेच ही पद्धत बंद केली नाही तर महाराष्ट्र कृषी उत्पन्नाची खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title:  The addition of additional judges in the market committee should be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.