कलेशी बालकांचे नाते जोडा :  सुरेखा बेंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:44 AM2019-01-22T01:44:54+5:302019-01-22T01:45:29+5:30

आधुनिक तेच्या काळात मुले संगणक, स्मार्ट फोन यांच्या आहारी गेल्याचे चित्र आजूबाजूला पहावयास मिळत आहे. विविध गेम्सचे एकप्रकारे व्यसन लागल्यामुळे मुलांना त्यांच्या सुप्त कलागुणांची जाणीवदेखील होत नाही.

Add a child to the art of art: Surekha Bendre | कलेशी बालकांचे नाते जोडा :  सुरेखा बेंद्रे

कलेशी बालकांचे नाते जोडा :  सुरेखा बेंद्रे

googlenewsNext

नाशिक : आधुनिक तेच्या काळात मुले संगणक, स्मार्ट फोन यांच्या आहारी गेल्याचे चित्र आजूबाजूला पहावयास मिळत आहे. विविध गेम्सचे एकप्रकारे व्यसन लागल्यामुळे मुलांना त्यांच्या सुप्त कलागुणांची जाणीवदेखील होत नाही. त्यामुळे कलागुणांना वाव मिळत नाही, पालकांनी त्याकडे लक्ष देत मुलांचे कलेशी जवळीक निर्माण करून देत मुलांचे नाते कलेशी जोडण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सुरेखा बेंद्रे यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित सोळाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बेंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. सोमवारी (दि.२१) स्पर्धेच्या प्रहिल्या चारदिवसीय फेरीचा प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, श्रीकांत बेणी, परीक्षक प्रमोद काकड, जुई बर्वे, डॉ. स्वाती वेदक, समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ उपस्थित होते. यावेळी बेंद्रे म्हणाल्या, भावी पिढीमधील क लागुण ओळखून त्यांना त्याची जाणीव करून देत ते विकसित करण्यासाठी शालेय जीवनापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी पालकांसह शिक्षकवर्गानेही ती जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.
सोमवारी एकूण पाच नाटके सादर झाली. दीपक मंडळाने ‘कोणी मोडलं’ हे विनोदी नाटक सादर केले. गिरीश जुन्नरे लिखित व कुंतल गायधनी दिग्दर्शित या नाटकात स्वामिनी कुलकर्णी, स्वरा घोलप, श्रीहरी महाजन, शिवानी बेळे, ओम पाटील, गोमांत पंचाक्षरी, नितीन फुलंब्रीकर, प्रतीक शुक्ल आदींच्या भूमिका होत्या.
श्रीमती रंगूबाई जुन्नरे हायस्कूलतर्फे ‘निर्धार’ हे नाटक सादर झाले.
मनीषा नलगे लिखित व अनुराधा देशपांडे दिग्दर्शित या नाटकातून फास्ट फूडच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला. पार्थ महाजन, कौशल मुळे, कृष्णा भोकरे, तन्मय सानप, आदित्य बैरागी, कनिष्क जोशी, देव पटेल आदींच्या भूमिका होत्या.
बालनाट्य आविष्काराने जिंकली मने
अभिरंग बाल कला संस्थेने ‘जेव्हा तायडी बदलते’ नाटक सादर केले. श्रीवर्धन शिखरे, श्रावणी शिखरे, प्रणम्य ढेरगे, अद्वैत दीक्षित आदींच्या भूमिका होत्या. शेवगावच्या बाळासाहेब भारदे विद्यालयाने ‘तुझ्या जागी मी असते तर..’ हे उमेश घेवरीकर दिग्दर्शित नाटक सादर के ले. येवल्याच्या आत्मा मालिक गुरु कुलने ‘हेचि दान देगा देवा’ हे नाटक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. धनंजय आहिरे, ओमकार नागरे, किशोर गायकवाड, कार्तिक कापडी, ऊर्मिला भोंडवे आदींनी भूमिका केल्या.

Web Title: Add a child to the art of art: Surekha Bendre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.