नाशिक-कळवण रस्त्याच्या रुंदीकरणाची कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:39 AM2018-07-01T01:39:15+5:302018-07-01T01:39:44+5:30

नाशिक-दिंडोरी-वणी- कळवण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, तूर्तास सदरहू रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दिंडोरी व वणी येथे उड्डाणपूल करण्यासंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.

 Action for Widening of Nashik-Kalwan Road | नाशिक-कळवण रस्त्याच्या रुंदीकरणाची कार्यवाही

नाशिक-कळवण रस्त्याच्या रुंदीकरणाची कार्यवाही

googlenewsNext

दिंडोरी : नाशिक-दिंडोरी-वणी- कळवण हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, तूर्तास सदरहू रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दिंडोरी व वणी येथे उड्डाणपूल करण्यासंदर्भात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. नाशिक शहरातील उड्डाणपुलाप्रमाणे दिंडोरी व वणी शहरात उड्डाणपूल व्हावा यावर सर्वांचे एकमत झाले असून, राष्ट्रीय महामार्ग होताना त्यात त्याचा समावेश करण्यात येणार आहे.  नाशिक-दिंडोरी-वणी - कळवण रस्त्याच्या कामकाजासंदर्भात खासदार चव्हाण यांनी दिंडोरी ग्रामस्थांची बैठक आयोजित करत ग्रामस्थांच्या सूचना जाणून घेतल्या. सदर रस्त्याबाबत योग्य ते नियोजन करून सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार असून, त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सदर रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून, त्यासाठी सर्व नागरिकांच्या भावना जाणून घेत सदर ररस्त्याचे काम मार्गी लावणार असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले. या रस्त्यावर वणी, दिंडोरी येथे उड्डाणपूल करावा की बाह्यवळण रस्ता करावा याबाबत चर्चा झाली. यात उड्डाणपूल व्हावा असे एकमताने ठरवण्यात आले. तसेच तळेगाव, अवनखेड येथे बोगदे करण्याची तसेच ओझरखेड धरणाखालील पूल मोठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. दरम्यान तूर्तास सदर रस्त्याची रु ंदी व नादुरु स्ती पाहता तातडीने सदर रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, नाशिक-दिंडोरी-वणी-कळवणपर्यंत १० मीटर रस्ता होणार आहे, तर दिंडोरी, वणी शहरात १४ मीटर रस्ता होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कंकरेजा यांनी सांगितले. आमदार नरहरी झिरवाळ यांनी लखमापूर फाटा येथे रस्ता रुंदीकरण करण्याची तसेच ओझरखेड येथे पूल करण्याची सूचना केली. तसेच दिंडोरी शहरात रस्त्यातील विजेचे खांब हलविण्याच्या सूचना केल्या.
बैठकीत नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, विश्वासराव देशमुख, नरेश देशमुख, राजू मोरे, तुषार वाघमारे, शिवाजी पिंगळ, नरेंद्र जाधव, योगेश बर्डे आदींनी विविध सूचना मांडल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, सर्व नगरसेवक, पंचायत समितीचे उपसभापती उत्तम जाधव, चंद्रकांत राजे, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी अनंत जवादवार, सहा पोलीस निरीक्षक पाटील, सतीश देशमुख, फारुख बाबा, मनोज ढिकले, संतोष मुरकुटे, रमेश बोरस्ते आदी उपस्थित होते सूत्रसंचालन नरेश देशमुख यांनी केले.

Web Title:  Action for Widening of Nashik-Kalwan Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.