धूम्रपान करणाऱ्यांवर ‘कोटपा’अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:41 AM2018-03-24T00:41:30+5:302018-03-24T00:41:30+5:30

सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाºयांवर ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा अन्वये सरकारवाडा हद्दीत पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) कारवाई केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली कारवाई ही शहरातील कोटपा कायद्यांतर्गत करण्यात आलेली पहिलीच कारवाई आहे़ यापूर्वी या कायद्याची शहरात अंमलबजावणी शून्य होती़

 Action taken under 'Kotpa' on smokers | धूम्रपान करणाऱ्यांवर ‘कोटपा’अंतर्गत कारवाई

धूम्रपान करणाऱ्यांवर ‘कोटपा’अंतर्गत कारवाई

googlenewsNext

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा परिसरात सिगारेट फुंकणाºयांवर ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३’ अर्थात कोटपा अन्वये सरकारवाडा हद्दीत पोलिसांनी गुरुवारी (दि. २२) कारवाई केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली कारवाई ही शहरातील कोटपा कायद्यांतर्गत करण्यात आलेली पहिलीच कारवाई आहे़ यापूर्वी या कायद्याची शहरात अंमलबजावणी शून्य होती़ सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा अधिनियम २००३ ( कोटपा ) या कायद्याचे संबंध हेल्थ फाउंडेशनने शहर पोलिसांना काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षण दिले़ या प्रशिक्षणानंतर गुरुवार (दि़ २२) पासून या कायद्यान्वये कारवाई करण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात  आली़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी. एस. राठोड, पोलीस नाईक संजय आहिरे, पोलीस हवालदार सागर हजारे, श्रीकांत महाजन यांच्या पथकाने के. टी. एच. एम. महाविद्यालय, पंडित कॉलनी, कुलकर्णी गार्डन, कॅनडा कॉर्नर, तिबेटियन मार्केट, कॉलेजरोड आदी ठिकाणी कारवाई केली.
शाळा व महाविद्यालय परिसरात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हे कायद्याचे गुन्हा आहे़ मात्र तरीही शहरातील एस. टी. डेपो, बसस्थानके, शाळा-महाविद्यालये, बाजार, तसेच धार्मिक तीर्थस्थळाच्या ठिकाणी सर्रास धूम्रपान केले जाते़ शहरात धूम्रपान, सुट्या सिगारेटची विक्री, अवैद्य गुटखा विक्री यास आळा घालण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत आता कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली जाणार आहे़
व्यसनापासून रोखण्यासाठी कारवाई आवश्यक
सार्वजिनक ठिकाणे तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस कायद्याने बंदी असून, त्यासाठीच कोटपा कायदा तयार करण्यात आला आहे़ युवा पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम आवश्यक आहे़
- अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सरकारवाडा पोलीस ठाणे

Web Title:  Action taken under 'Kotpa' on smokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.