गंगापूररोड परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:14 AM2019-01-13T00:14:34+5:302019-01-13T00:16:27+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गंगापूर रोडला अतिक्रमण हटावची कारवाई करून रस्त्याला अडथळे ठरणारे पत्र्याचे शेड, ओटे, रस्त्यात चारचाकी वाहने उभी करून भाजीपाला, मासेविक्री करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला तर मासेमारी करणाºया दुकानदाराची दुकाने सील करण्यात आली.

Action taken against encroachment department of Gangapur Road area | गंगापूररोड परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

गंगापूररोड परिसरात मनपाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

Next
ठळक मुद्देदुकाने सील : पत्र्याचे शेड, ओटे उद््ध्वस्त

गंगापूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गंगापूर रोडला अतिक्रमण हटावची कारवाई करून रस्त्याला अडथळे ठरणारे पत्र्याचे शेड, ओटे, रस्त्यात चारचाकी वाहने उभी करून भाजीपाला, मासेविक्री करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला तर मासेमारी करणाºया दुकानदाराची दुकाने सील करण्यात आली.
नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि पश्चिम विभाग यांच्या संयुक्त कारवाईत गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर येथील अनिल सोपे (अनिल फीश सेंटर) यांचे दुकान सील करण्यात आले. आनंदगीत हौ. सोसायटी कृषीनगर येथील शेड हटविण्यात आले. सावरकरनगर येथील बापू भोई (मासे विक्रेते) यांचा मासे विक्रीचा व्यवसाय व वाणिज्य वापर बंद करणेत आला.
रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या राहणाºया भाजीविक्रेत्यांचा भाजीपाला व इतर तत्सम वस्तू ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे मार्गदर्शनानुसार, उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली एम. डी. पगारे, नगरनियोजन विभागाचे अभियंता सुभाष पाटील, अतिक्रमण विभागाची २ पथके व दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन पोलीस बंदोबस्त यांच्यासह अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे काढण्यात आली आहेत. दरम्यान शहरातील अन्य भागातही महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.
कडक कारवाई करण्याचा इशारा
सहाही विभागांमध्ये अशा प्रकारे ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय करणाºया भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हेदेखील दाखल करणेत येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाºया तसेच पार्किंगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेणेबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर आवाहनाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांचे अतिक्रमण काढून घेतले नाही, त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Action taken against encroachment department of Gangapur Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.