नाशिक शहरातील अनधिकृत हॉटेल्सविरोधी जानेवारीअखेर कारवाईची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:51 PM2018-01-02T18:51:11+5:302018-01-02T18:52:10+5:30

आयुक्तांची स्पष्टोक्ती : महासभेत विरोधक विचारणार जाब

 Action to take action against the unauthorized anti-national anti-clash in Nashik City by January | नाशिक शहरातील अनधिकृत हॉटेल्सविरोधी जानेवारीअखेर कारवाईची मोहीम

नाशिक शहरातील अनधिकृत हॉटेल्सविरोधी जानेवारीअखेर कारवाईची मोहीम

Next
ठळक मुद्देअनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉटेल्ससंबंधीचा सर्वेक्षण अहवाल येत्या १५ ते २० दिवसात हाती शहरात मोठ्या प्रमाणावर टेरेसवर विनापरवाना हॉटेल्सचा व्यवसाय सुरू असतानाही नगररचना विभागाकडून त्याकडे काणाडोळा

नाशिक - शहरात टेरेससह तळमजल्यांवर अनधिकृतपणे सुरू असलेल्या हॉटेल्ससंबंधीचा सर्वेक्षण अहवाल येत्या १५ ते २० दिवसात हाती आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, बुधवारी (दि.३) होणाºया महासभेत शिवसेनेसह विरोधकांकडून या प्रकरणी नगररचना विभागाला जाब विचारला जाणार आहे.
मुंबईतील लोअर परळ भागातील कमला कंपाऊण्ड मिलमधील टेरेस रेस्टॉरंट व पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबई महापालिकेने टेरेस व तळमजल्यावर अनधिकृतपणे थाटलेल्या हॉटेल्स-रेस्टॉरंटवर कारवाई आरंभली आहे. मुंबईप्रमाणेच नाशिक महापालिकेनेही अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. त्याबाबत बोलताना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, शहरात विनापरवाना टेरेस व तळमजल्यावर चालविल्या जाणा-या हॉटेल्स-रेस्टॉरंटचा नगररचना विभागामार्फत सर्वे सुरू असून येत्या १५ ते २० दिवसात सर्वेक्षणाचा अहवाल हाती आल्यानंतर अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई केली जाईल. दरम्यान, बुधवारी (दि.३) महापालिकेची महासभा होत असून यावेळी टेरेस हॉटेलप्रकरणी शिवसेनेसह विरोधी पक्षाकडून प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर टेरेसवर विनापरवाना हॉटेल्सचा व्यवसाय सुरू असतानाही नगररचना विभागाकडून त्याकडे काणाडोळा केला जात आहे. अनेक हॉटेल्समध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनाही केलेली नाही. त्याबाबत प्रशासनास जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Web Title:  Action to take action against the unauthorized anti-national anti-clash in Nashik City by January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.