नाशिकमध्ये रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:57 PM2018-08-04T14:57:41+5:302018-08-04T14:58:19+5:30

शिवाजी मंडईसमोरील विक्रेत्यांना वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात

Action on the street vendors in Nashik | नाशिकमध्ये रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांवर कारवाई

नाशिकमध्ये रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांवर कारवाई

Next

सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात आली.
शिवाजी मंडईसमोरील विक्रेत्यांना वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत मंडई बाहेर व्यवसाय करणाºया व्यावसायिकांचा भाजीपाला जप्त करण्यात आला. यावेळी व्यावसायिकांची पळापळ झाली होती. महापालिकेच्या चार वाहनांमध्ये हा माल जप्त करण्यात आला. महापालिकेने या विक्रेत्यांवर यापूवीर्ही कारवाई केली आहे. वारंवार सूचित करुनही हे व्यावसायिक ऐकत नसल्याने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांनी तीव्र विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस बंदोबस्तामुळे हा विरोध फार टिकू शकला नाही. या मोहिमेत मनपाचे २५ कर्मचारी सहभागी झाले होते.
शिवाजी मंडईपासून सुरू झालेली ही मोहीम पुढे कार्बन नाका शिवाजीनगर येथे गेली. तेथेही अनधिकृत व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना हटविण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. या व्यावसायिकांना अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असताना हे व्यावसायिक पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय करीत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
 

 

Web Title: Action on the street vendors in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.