आचार्य शिवमुनीजी म.सा. यांची रविवारी शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:39 AM2019-05-04T00:39:35+5:302019-05-04T00:40:32+5:30

जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजाचे गुरू ध्यानयोगी आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. यांचे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) आगमन झाले असून, जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक संचलित गुरू गणेश आनंद गौशाळा, खंबाळे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दि. १३ मेपर्यंत त्यांचे नाशिक परिसरात वास्तव्य राहणार असून, यानिमित्त ध्यान शिबिरासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (दि. ५) आचार्यांचे शोभायात्रेने आर. के. स्थानक येथे आगमन होणार आहे.

Acharya Shivamuni M.Sa. Sunday celebrations | आचार्य शिवमुनीजी म.सा. यांची रविवारी शोभायात्रा

आचार्य शिवमुनीजी म.सा. यांची रविवारी शोभायात्रा

Next
ठळक मुद्देध्यान शिबिर : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : जैन श्वेतांबर स्थानकवासी समाजाचे गुरू ध्यानयोगी आचार्य डॉ. शिवमुनीजी म. सा. यांचे जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) आगमन झाले असून, जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघ, नाशिक संचलित गुरू गणेश आनंद गौशाळा, खंबाळे येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. दि. १३ मेपर्यंत त्यांचे नाशिक परिसरात वास्तव्य राहणार असून, यानिमित्त ध्यान शिबिरासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी (दि. ५) आचार्यांचे शोभायात्रेने आर. के. स्थानक येथे आगमन होणार आहे.
आचार्य शिवमुनीजी म. सा. हे उच्च विद्याविभूषित असून, ध्यान धारणेमध्ये लिन असतात. रविवारी गुरुदेवांचे राका कॉलनीपासून सीबीएस, शालिमार, एम. जी. रोड, अशेकस्तंभ, रविवार कारंजामार्गे शोभायात्रेने आर. के. स्थानक येथे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता प्रवचन होईल. तसेच सायंकाळी श्री संघातर्फे भक्तिसंध्या होणार आहे. यानिमित्त प. पू. आचार्य यांच्यासमवेत १२ साधूसंत तसेच ७० साध्वी उपस्थित राहणार आहेत. श्री संघ अंतर्गत विविध १६ संस्था कार्यरत असून, या कार्यक्रमासाठी जैन श्वेतांबर स्थानकवासी श्रीसंघाचे संघपती राजमल भंडारी, उपाध्यक्ष मंगलचंद साखला, सचिव पंकजकुमार श्यामसुका, सुभाष लोढा, शांतीलाल हिरण, सुभाष भंडारी आदींसह पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.

Web Title: Acharya Shivamuni M.Sa. Sunday celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.