चांदवड-मनमाड रोडवर अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:31 AM2018-06-23T00:31:00+5:302018-06-23T00:31:14+5:30

तालुक्यातील चांदवड- मनमाड रोडवर शिंगवे मेसनखेडे शिवारात मोटारसायकलला पिकअपने जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

 Accident on Chandwad-Manmad road; One killed | चांदवड-मनमाड रोडवर अपघात; एक ठार

चांदवड-मनमाड रोडवर अपघात; एक ठार

googlenewsNext

चांदवड : तालुक्यातील चांदवड- मनमाड रोडवर शिंगवे मेसनखेडे शिवारात मोटारसायकलला पिकअपने जबर धडक दिल्याने एक जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास चांदवडकडून मनमाडकडे जाणाऱ्या पिकअपचा (क्र. एमएच ४१ एजी १५९५) चालक भैयासाहेब धोंडीराम अहेर (रा. मळगाव, ता. नांदगाव) याने रहदारीकडे दुर्लक्ष करून मेसनखेडे शिवारात रॉँग साइडला जाऊन वाहन भरधाव चालवून समोरून येणाºया (मनमाडकडून-चांदवडकडे येणाºया) नंबर नसलेल्या प्लटिंना मोटारसायकलला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक भाऊसाहेब भगवान पवार (२५) जागीच ठार झाले, तर पाठीमागे बसलेले खंडू सीताराम पवार (२३, दोघे, रा. मेसनखेडे) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी व पीकअपचे मोठे नुकसान झाले असून, चांदवड पोलिसांनी पिकअप चालक भैयासाहेब अहेर यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र सौंदाणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title:  Accident on Chandwad-Manmad road; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात