फूल विक्रे ता खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:42 AM2018-02-18T00:42:52+5:302018-02-18T00:46:20+5:30

सुरगाणा : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात फूल विक्रेत्याच्या खून प्रकरणातील वर्षभरापासून फरार संशयित आरोपीस सुरगाणा पोलिसांनी अटक केली आहे.

The absconding accused in the murder case of the florist killed the accused | फूल विक्रे ता खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

फूल विक्रे ता खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

Next
ठळक मुद्देसुरगाणा पोलिसांनी अटक केलीमारहाण करण्यापुर्वी या सर्वांनी एकत्रित फोटो काढले

सुरगाणा : नाशिक शहरातील पंचवटी परिसरात फूल विक्रेत्याच्या खून प्रकरणातील वर्षभरापासून फरार संशयित आरोपीस
सुरगाणा पोलिसांनी अटक केली आहे.
नाशिक येथील पंचवटीतील फूल विक्रेत्याचा मृतदेह येथून जवळच असलेल्या उंबरपाडा शिवारात रस्त्यालगत मिळून
आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पंचवटीतील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. मृत व्यक्तीच्या पत्नीने
एका व्यक्तीसह त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मंगेश शालीग्राम पाटील (४२) याचा मृतदेह येथून जवळच असलेल्या उंबरपाडा गावाजवळ आढळून आला होता. ते पंचवटीतील दिंडोरी रस्त्यालगत मायको दवाखान्याच्या पाठीमागे गल्ली नं.२ मध्ये राहात होते. मंगेश याची पत्नी नंदा पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद देऊन नाशिकमधीलच काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता.
यामध्ये पवन खत्री, विकी ठाकुर, जयेश दिवे, धिरज ललवानी, सुनिल उर्फ जॉन काजळे सर्व राहणार पंचवटी यांना अटक झाली होती. ते सर्व तुरु ंगात आहेत. मात्र या गुन्ह्यÞातील दिपक उर्फ राहुल वसंत नंदन हा संशयीत आरोपी गुन्हा घडल्या पासून फरार होता. त्यास सुरगाणा पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महीन्यात पंचवटीतील फूल विक्र ेता मंगेश पाटील यांना वरील संशयीतांनी तालुक्यातील करवंदे गावाजवळ आणून हॉकी स्टीक, लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी मंगेशने आरडा ओरड केल्याने ग्रामस्थ आवाजाच्या दिशेने धावून येऊ लागल्याने मंगेशला पुन्हा वाहनात टाकून सुरगाण्या जवळील उंबरपाडा गावाजवळ टाकून पसार झाले होते. संशयीत आरोंपी जवळील मोबाईलमधील मिळालेल्या फोटोंच्या पुराव्यांवरून या संशियतांना अटक करण्यात आली होती. मारहाण करण्यापुर्वी या सर्वांनी एकत्रित फोटो काढले होते.

Web Title: The absconding accused in the murder case of the florist killed the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा