आरती सिंह यांची सरकारी वकिलांसोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:17 AM2019-06-12T00:17:40+5:302019-06-12T00:18:49+5:30

जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारपक्षातर्फेचांगल्याप्रकारे बाजू मांडून दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील सर्व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील, पैरवी अधिकारी यांची बैठक बोलावली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Aarti Singh discusses with government advocates | आरती सिंह यांची सरकारी वकिलांसोबत चर्चा

आरती सिंह यांची सरकारी वकिलांसोबत चर्चा

Next

नाशिक : जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी खटल्यांमध्ये सरकारपक्षातर्फेचांगल्याप्रकारे बाजू मांडून दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाणात वाढ व्हावी, या उद्देशाने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मंगळवारी (दि.११) जिल्ह्यातील सर्व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील, पैरवी अधिकारी यांची बैठक बोलावली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा न्यायालयातील सभागृहात झालेल्या या बैठकप्रसंगी जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अजय मिसर यांच्यासह नाशिक, निफाड आणि मालेगाव सत्र न्यायालयातील सर्व सहायक अभियोक्ता तसेच अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगावचे अपर पोलीस
अधीक्षक निलोत्पल, दोषसिद्धी शाखेचे निरीक्षक प्रभाकर पाटील, पैरवी पोलीस अधिकारी निसार सय्यद यांच्यासह नाशिक,
निफाड व मालेगाव सत्र न्यायालयातील ४० पैरवी अधिकारी उपस्थित होते.
शासनाने सरकारी कारभार सुधारण्याच्या दृष्टीने अनेक उद्दिष्टे ठरविली आहेत. त्यात न्यायालयातील दोषसिद्धीचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

Web Title: Aarti Singh discusses with government advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.