9-year-old son dies in bus crash | बसच्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू 
बसच्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू 

नांदुरा - येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पंचायत समिती जवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १४ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता घडली.
जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम.एच.४० ८८३७ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव व निष्काळजीपणे चालवून पंचायत समितीजवळ शिवम गजानन काटे (वय ९ वर्षे ) याला धडक दिली. धडक एवढी जोरात होती, की मुलाच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतरही बस चालकाने बस न थांबविता नांदुरा बसस्थानकात नेली. नागरिकांनी तात्काळ मुलाला उपचाराकरिता नांदूरा येथील शासकीय प्राथमिक रुग्णालयात भरती केले. यावेळी डॉक्टरांनी मुलास मृत घोषित केले. याप्रकरणी नांदुरा  पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 


Web Title: 9-year-old son dies in bus crash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.