७७ हजारांचे ४१ टायर चोरट्यांनी हातोहात केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 05:56 PM2019-07-14T17:56:48+5:302019-07-14T17:58:12+5:30

चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला.

77 thousand of 41 tires have been looted by the thieves | ७७ हजारांचे ४१ टायर चोरट्यांनी हातोहात केले लंपास

७७ हजारांचे ४१ टायर चोरट्यांनी हातोहात केले लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देकमी दरात किराणा देण्याच्या आमीषापोटी २ लाखांना गंडा४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना

नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत गीतांजली अपार्टमेंटमध्ये असलेल्या मालविया टायर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ७७ हजार रुपये किमतीचे ४१ टायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुकानाच्या गाळ्यात विक्रीसाठी १२ हजार रुपये किमतीचे ‘जेके मिचल’ कंपनीचे १२ हजार रुपये किमतीचे १५ नग, ६५ हजार रुपयांचे गुडइयर, योकोहम, ब्रीजीयेन कंपनीचे २६ टायर असे एकूण ७७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी हातोहात लंपास केल्याची फिर्याद राजेंद्र जगदीश मालविया (५८) यांनी मुंबईनाका पोलिसांकडे केली आहे. चोरट्यांनी लंपास केलेले सर्व नवेकोरे टायर हे चारचाकी वाहनांचे होते, असे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद गाळ्याचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करून वरीलप्रमाणे ऐवज चोरी करून पोबारा केला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
-----
कमी दरात किराणा देण्याच्या आमीषापोटी २ लाखांना गंडा
नाशिक : कमी दरात किराणा पुरविण्याचे आश्वासन देत नातवाचे आॅपरेशनचे भावनिक कारण सांगून माधुरी एखंडे (४०, रा.शांतीनगर, मखमलाबाद) यांच्या ब्युटि पार्लरमध्ये येऊन चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांना सुमारे दोन लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १ जानेवारी २०१८ ते १३ जुलै २०१९ या कालावधीमध्ये संशयित सोनम अनिल चौथे, अनिल रामचंद्र चौथे, प्रेम अनिल चौथे (रा. तळेनगर, रामवाडी) यांनी एखंडे यांच्यासह अन्य महिलांची भेट घेतली. त्यांना कमी दरात किराणा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत अन्नपूर्णा महिला को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था स्वत:ची असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच त्यांचे ब्युटि पार्लर गाठून नातवाच्या शस्त्रक्रियेचे भावनिक कारण पुढे करून संशयित चौथे दाम्पत्याने एखंडे यांच्यासह अन्य महिलांकडून पैसे उकळून सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केली. किराणा माल विक्री करण्याच्या उद्देशाने या भामट्या जोडीने महिलांकडून पैसे उकळल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
आर्थिक फसवणुकीचे विविध फंडे समोर येत असून, शहरात मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया ते स्मार्ट डिजिटल बॅँकिंगप्रणालीचा गैरवापर करत अनेकांना चुना लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर किराणा माल कमी दरात पोहचविण्याचे सांगून तब्बल दोन लाख रुपयांना गंडा घालण्याचा नवीनच प्रकार पंचवटीत घडला. गुन्हेगार आर्थिक फसवणुकीसाठी विविध प्रकारचे फंडे वापरत असल्याने पोलिसांपुढे आर्थिक गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. एखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक साखरे करीत आहेत.

Web Title: 77 thousand of 41 tires have been looted by the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.