खड्डेमुक्त महाराष्टÑसाठी सात हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:58 PM2018-02-13T23:58:12+5:302018-02-14T00:17:56+5:30

नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्वी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रुपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्तीची कामे तातडीने केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खड्ड्यांबरोबरच नाशिक जिल्ह्णात सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

7000 crores for paddy-free Maharashtra | खड्डेमुक्त महाराष्टÑसाठी सात हजार कोटी

खड्डेमुक्त महाराष्टÑसाठी सात हजार कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील : जिल्ह्यातील ७० पुलांचीही दुरुस्ती सुरूसप्तशृंगगड येथे फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम त्वरित पूर्ण करून ती खुली करण्याच्या सूचना

नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पूर्वी २८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रुपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरुस्तीची कामे तातडीने केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खड्ड्यांबरोबरच नाशिक जिल्ह्णात सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने खड्डेमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेतले राज्यात ५७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यात येत असून, या अभियानात चांगली कामगिरी करणाºयांचे कौतुक करण्यासाठी राज्यभर दौरा केला. नाशिक हा शेवटचा जिल्हा असल्याने नाशिकच्या अधिकाºयांनीही चांगले काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी पाटील यांच्या हस्ते चांगले काम करणाºया ५०हून अधिक अधिकाºयांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांनी नाशिक जिल्ह्णाचा आढावा सादर केला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक मंडळात सन २०१७च्या अर्थसंकल्पात ४४ कामे मंजूर असून, चार पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले. जेट पॅचद्वारे खड्डे भरण्यात येत असल्याने ही कामे टिकाऊ असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच राज्यात काही ठिकाणी पूल कोसळण्याच्या घटना पाहता नाशिक जिल्ह्णातील सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार जे. पी. गावित, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, कार्यकारी अभियंता एस. एस. पाटील उपस्थित होते.
सप्तशृंगगडावरील ट्रॉलीबाबत सूचनासप्तशृंगगड येथे फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे काम त्वरित पूर्ण करून ती भाविकांसाठी खुली करण्याच्या सूचनाही चंद्रकात पाटील यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावरून प्रवास करीत असताना वाटेत स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचे मान्य करून पाटील यांनी राज्यमार्गांवर विशिष्ट अंतरावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्यासाठी सीएसआरमधून निधी मिळवून देण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीची जागा जाहिरात फलकांसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पाटील यांनी दिले.

Web Title: 7000 crores for paddy-free Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.