देवदर्शनासाठी आलेल्या महिलांची ६५ हजाराची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:01 PM2018-11-19T17:01:27+5:302018-11-19T17:01:55+5:30

नाशिक : हैदराबाद येथून देवदर्शनासाठी नाशिकला आलेल्या दोन महिलांच्या पर्समधून चोरट्यांनी ६५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़१९) दुपारी घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

65 thousand cash lamps for the women who visited the demonstration | देवदर्शनासाठी आलेल्या महिलांची ६५ हजाराची रोकड लंपास

देवदर्शनासाठी आलेल्या महिलांची ६५ हजाराची रोकड लंपास

Next
ठळक मुद्देपंचवटी परिसरात चोरट्यांचा उपद्रव

नाशिक : हैदराबाद येथून देवदर्शनासाठी नाशिकला आलेल्या दोन महिलांच्या पर्समधून चोरट्यांनी ६५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि़१९) दुपारी घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद येथील रहिवासी छाया के व त्यांच्या सहकारी सोमवारी सकाळी नाशिकला देवदर्शनासाठी इनोव्हा कारने आल्या होत्या़ सकाळी त्रंबकेश्वर येथील देवदर्शन आटोपल्यानंतर त्या गंगाघाटावर देवदर्शनासाठी आले होते़ कार्तिक एकादशीनिमित्त पंचवटीतील मंदिरांमध्ये दर्शन घेत असताना भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी छाया के यांच्या पर्समधून पंधरा हजार तर त्यांच्या महिला सहकाऱ्याच्या बॅगमधून ५० हजार अशी ६५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.

छाया के यांना आपल्या पर्सची चेन उघडी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पर्सची तपासणी केली असता रोकड चोरी झाल्याचे कळले़ त्यांनी तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली़ दरम्यान, दिवाळीनिमित्त सुट्टी असल्याने सध्या परराज्यातील भाविक देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने पंचवटी परिसरात येत असून या ठिकाणी चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे़

Web Title: 65 thousand cash lamps for the women who visited the demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.