जिल्ह्यात खरिपाची ६१ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:53 AM2018-07-18T01:53:02+5:302018-07-18T01:53:25+5:30

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

61 percent sowing of Kharif in the district | जिल्ह्यात खरिपाची ६१ टक्के पेरणी

जिल्ह्यात खरिपाची ६१ टक्के पेरणी

Next

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
मान्सूनच्या पूर्वार्धात जून महिन्यातील शेवटचे दोन आठवडे कोरडे गेल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु जुलैच्या दुसºया आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने खरिपाच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, जिल्ह्णातील सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ४ लाख ६५ हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. यात २६.२३ टक्के भात, ७.४१ टक्के ज्वारी, ६१.११ टक्के बाजरी, ५.३४ टक्के नागली, ९८.५८ टक्के मका व २१.५१ अन्य तृणधान्यांसह एकूण ६४.२६ टक्के तृण धान्याची पेरणी पूर्ण झाली आहे.
तर कडधान्य पिकांमध्ये ४६.५५ टक्के तूर, ४६.७२ टक्के उडीद, १०६.३७ मूग व २९.७ टक्के अन्य कडधान्यांसह ५६.३९ टक्के कडधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गळीत धान्य प्रकारात भुईमूग ४८.२९ टक्के, सूर्यफूल २.०३ टक्के, सोयाबीन ४७.६ टक्के, खुरासणी ९.१६ टक्के व ४.७० टक्के गळीत धान्यांसह एकूण ४०.७७ टक्के गळीत धान्यांची पेरणी पूर्ण झाली आहे.
३ लाख हेक्टरवर अन्नधान्य : ६४.२६ टक्के तृणधान्य, तर ५६.३९ टक्के कडधान्याचे पीक.
कापसाची ८४ टक्के लागवड पूर्ण
नाशिक जिल्ह्यात कापूस लागवडीचे ४७ हजार २१६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ३९ हजार ७०९ हेक्टर म्हणजे सुमारे ८४.९ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पीक घेतले जाते. त्यापैकी २ लाख ९१ हजार १०६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ४५ हजार ६७७ हेक्टरपैकी २२ हजार ७५५ हेक्टरवर कडधान्याची पेरणी झाली आहे. यात एकूण ४ लाख ९८ हजार ६५६ हेक्टरपैकी ३ लाख १६ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

Web Title: 61 percent sowing of Kharif in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.