५६७ विनाहेल्मेटधारकांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:29 AM2019-05-15T01:29:03+5:302019-05-15T01:29:24+5:30

विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कारवाईचा बडगा उगारला. मोहिमेच्या दुसºया दिवशी हेल्मेट न वापरणाºया ५६७ नाशिककरांवर तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया ७७० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून २ लाख ८३ हजार ५०० रुपये तर अन्य बेशिस्त वाहनचालकांकडून १ लाख ५८ हजार ६०० असा एकूण ४ लाख ४२ हजार १०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.

567 Badah on unarmed shareholders | ५६७ विनाहेल्मेटधारकांवर बडगा

५६७ विनाहेल्मेटधारकांवर बडगा

Next
ठळक मुद्देमोहिमेचा दुसरा दिवस : एकूण ४ लाख ४२ हजारांचा दंड वसूल

नाशिक : विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी मंगळवारी (दि.१४) सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कारवाईचा बडगा उगारला. मोहिमेच्या दुसºया दिवशी हेल्मेट न वापरणाºया ५६७ नाशिककरांवर तसेच अन्य वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाºया ७७० बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून २ लाख ८३ हजार ५०० रुपये तर अन्य बेशिस्त वाहनचालकांकडून १ लाख ५८ हजार ६०० असा एकूण ४ लाख ४२ हजार १०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्त्यावर होणाºया अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच हेल्मेट-सीट बेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत शहरात २६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या पाच तासांत हेल्मेट न वापरणाºया ९४४ दुचाकीस्वारांवर कारवाई करत ४ लाख ७२ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला होता, तर सीट बेल्टपासून विविध प्रकारे वाहतूक नियमांच्या उल्लंघनापोटी १ लाख ८ हजार ५०० रुपये बेशिस्त नाशिककरांनी पोलिसांकडे जमा केले होते.
कारवाईचा आकडा घसरला
कारवाईचा धसका घेत दुसºया दिवशी विना हेल्मेट दुचाकी चालविणाºयांचे प्रमाण शहरातील रस्त्यांवर कमी प्रमाणात दिसून आल्याचा दावा पोलिसांनी केला. पहिल्या दिवशी साडेनऊशे दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्याचे दिसून आले, मात्र मंगळवारी हे प्रमाण घसरले. साडेपाचशे हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांना कारवाईला सामोरे जावे लागले. या दोन दिवसांमध्ये ५ लाख ९७ हजार ७०० रुपयांची दंड आकारणी बेशिस्त वाहनचालकांकडून पोलिसांनी केली आहे.
जनजागृतीचा प्रभाव
हेल्मेटविषयक झालेल्या जनजागृतीचा प्रभाव नाशिककरांमध्ये दुसºया दिवशी चांगल्या प्रमाणात पहावयास मिळाला. शहर पोलिसांनी सुरू केलेल्या हेल्मेट, सीट बेल्ट सक्तीच्या तपासणी मोहिमेत शहरातील सुमारे पंधराहून अधिक स्वयंसेवी संघटनांनी सहभाग घेतला आहे. या संस्थांच्या स्वयंसेवकांकडून जनप्रबोधनपर फलक घेऊन नाकाबंदीच्या पॉइंटवर जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: 567 Badah on unarmed shareholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.