गोल्फ क्लबवर ५१ फे-या मारत आरतीने गुरू रंजय यांना दिली श्रध्दांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 04:22 PM2018-01-01T16:22:38+5:302018-01-01T17:17:45+5:30

‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबईमध्ये या थर्टी फर्स्टला केला जाणार होता; मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांचे अकाली निधन झाले.

51 felicitated on the golf club, gave a tribute to Guru Ranjay. | गोल्फ क्लबवर ५१ फे-या मारत आरतीने गुरू रंजय यांना दिली श्रध्दांजली!

गोल्फ क्लबवर ५१ फे-या मारत आरतीने गुरू रंजय यांना दिली श्रध्दांजली!

googlenewsNext
ठळक मुद्देत्रिवेदी यांनी २०१३ सालापासून एक नवा पायंडा शहरात पाडला होतारविवारी (दि.३१) दुपारी चार वाजेपर्यंत ५१ फे-या तिने पूर्ण केल्या. आपल्या गुरूंच्या स्मृतींना आरतीने त्यांच्याच उपक्रमाची पुनरावृत्ती करत आगळी श्रध्दांजली वाहिली.

नाशिक : भोसला सैनिकी महाविद्यालयात शिकणारी आरती निशात ही मॅरेथॉनपटू स्वर्गीय रंजय त्रिवेदी यांची विद्यार्थिनी आहे. तिने नववर्षाच्या प्रारंभी रविवारी (दि.३१) गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर सलग आठ तास चालत ५१ फे-या पूर्ण करुन त्रिवेदी यांना आगळी श्रध्दांजली दिली.
रंजय त्रिवेदी हे दरवर्षी तरुणाईला व्यसनमुक्ती आणि सुदृढ आरोग्याचा संकल्प करण्याचा संदेश सलग शेकडो तास चालून नववर्षाच्या प्रारंभी देत होते; मात्र यावर्षी त्यांचा हा संदेश आरतीने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नाशिककरांना दिला.
मॅरेथॉनमध्ये धावण्याचा अनुभव असलेली आरती ही त्रिवेदी यांची विद्यार्थिनी आहे. विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासाठी आरतीला त्यांच्याकडून नेहमीच मार्गदर्शन मिळत राहिले. त्यामुळे आपल्या गुरूंच्या स्मृतींना आरतीने त्यांच्याच उपक्रमाची पुनरावृत्ती करत आगळी श्रध्दांजली वाहिली.
‘मॅरेथॉन वॉकमॅन’ अशी ओळख प्राप्त करणारे त्रिवेदी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नाशिककर हळहळले. अवघे वीस दिवस वर्ष संपण्यासाठी शिल्लक होते. नाशिककर त्रिवेदी यांच्याकडून नवा विक्रम मुंबईमध्ये या थर्टी फर्स्टला केला जाणार होता; मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. त्यांचे अकाली निधन झाले.
त्रिवेदी यांनी २०१३ सालापासून एक नवा पायंडा शहरात पाडला होता. नववर्षाचे स्वागताच्या औचित्यावर ते सलग कान्हेरे मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकवर फे-या मारत होते.२०१३ साली त्यांनी सलग २४ तास पायी चालून एक विक्रम नोंदविला होता. तसेच २०१४साली थर्टी फस्टला १०० तास तर २०१५मध्ये सहा दिवस-रात्र (१४४) तास चालण्याचा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला होता आणि २०१६च्या थर्टी फर्स्टला त्यांनी सलग दोनशे तास चालण्याचा संकल्प सोडला आणि ९ जानेवारी २०१७ रोजी त्यांनी तो पूर्ण केला होता. यावर्षी त्रिवेदी यांचा मुंबईमध्ये थर्टी फर्स्ट रोजी वांद्रे ते गेटवे आॅफ इंडियापर्यंत सलग ४८ तास चालण्याचा मानस होता; मात्र त्यापुर्वी त्यांचे दुर्देवी निधन झाले. आरतीने त्यांच्या सहा वर्षापासूनचा उपक्रमाचा विसर नाशिककरांना पडू दिला नाही. सलग नऊ तास पायी जॉगिंंकट्रॅकवर चालून रविवारी (दि.३१) दुपारी चार वाजेपर्यंत ५१ फे-या तिने पूर्ण केल्या.
 

Web Title: 51 felicitated on the golf club, gave a tribute to Guru Ranjay.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.