मेगाब्लॉकमुळे पाच रेल्वे रद्द; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:32 AM2019-02-11T00:32:09+5:302019-02-11T00:33:23+5:30

कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या पाच महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. गेल्या काही महिन्यांपासून सततच्या रेल्वे मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना विस्कळीत रेल्वे सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.

5 trains canceled due to mega block; Passengers' arrival | मेगाब्लॉकमुळे पाच रेल्वे रद्द; प्रवाशांचे हाल

मेगाब्लॉकमुळे पाच रेल्वे रद्द; प्रवाशांचे हाल

Next

मनमाड : कल्याण रेल्वे स्थानकात रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे मनमाड रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या पाच महत्त्वाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. गेल्या काही महिन्यांपासून सततच्या रेल्वे मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना विस्कळीत रेल्वे सेवेचा त्रास सहन करावा लागत आहे.
कल्याण स्थानकावर रविवारी सकाळी १०.४५ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात आला. या मेगाब्लॉकमुळे मनमाड स्थानकावरून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्सप्रेस सह भुसावळ -पुणे एक्सप्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या.

Web Title: 5 trains canceled due to mega block; Passengers' arrival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.