लासलगाव : कांदा भावातील तेजी पाहता मुंबई व पुणे येथील काही मोठ्या कांदा व्यापाºयांनी नफा मिळविण्याच्या हेतूने थेट इजिप्तमधून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात केल्यामुळे शुक्रवारी येथील बाजारपेठेत ४०० रुपयांनी भाव घसरले. सरासरी भाव २१०० रुपये भाव होते. सकाळी २४११ कमाल ते सरासरी २१०० रुपये भाव होते.
गुरुवारी येथील मुख्य बाजार समितीत ११०० वाहने कांद्याची आवक झाली. कांद्याला कमीत कमी ७०० प्रतिक्विंटल, तर सरासरी २३५०, तर जास्तीत जास्त २६५० रु पये भाव होते.
येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांदा आवक टिकून, बाजारभावात घसरण झाल्याचे चित्र आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसात दिसले.कांदा सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर काही व्यापाºयांनी इजिप्तचा कांदा आयात केल्याच्या बातम्या आल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर इ. ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४६७०० क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ७०० ते २३५१, तर सरासरी २२५० प्रतिक्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ३९०८५ क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे भाव किमान ७०० ते २४५३, तर सरासरी २२५० पर्यंत होते.

 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.