नाशिक शहरातील ३८ सायकलिस्टने केली पूर्ण नाईट बीआरएम राईड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:59 PM2018-04-16T12:59:06+5:302018-04-16T12:59:06+5:30

बीआरएम म्हणजेच ब्रेवे रँडोनर्स माँडियॉक्स या उपक्र मातील २०० किमीची नाईट राईड येथील ३८ रायडर्सनी पुर्ण

38 cyclists in Nashik City completed the full night BRM ride | नाशिक शहरातील ३८ सायकलिस्टने केली पूर्ण नाईट बीआरएम राईड

नाशिक शहरातील ३८ सायकलिस्टने केली पूर्ण नाईट बीआरएम राईड

Next
ठळक मुद्देराईड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी १३.५ तासांची वेळ देण्यात आली होती धुळ्याच्या एका जोडप्यासह एकूण ५ महिलांनी सहभाग घेत राईड पूर्ण

नाशिक : बीआरएम म्हणजेच ब्रेवे रँडोनर्स माँडियॉक्स या उपक्र मातील २०० किमीची नाईट राईड येथील ३८ रायडर्सनी पुर्ण केली. या मोहिमेला शनिवार (दि. १४) पासून प्रारंभ करण्यात आला. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून बचाव व्हावा म्हणून सलग तिसऱ्या वर्षी एप्रिल महिन्यातील ही राईड रात्रीच्यावेळी काढण्यात आली.
शनिवारी संध्याकाळी ६ वाजता मुंबईनाका येथून प्रारंभ करून - सोग्रास फाटा (चांदवड मार्गावरील) - नाशिक- घाटानेवारी मंदिर (नागपूर) - नाशिककडे परत असा राईडचा मार्ग होता. राईड यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी १३.५ तासांची वेळ देण्यात आली होती. राईडला सुरु वात केलेल्या ४० पैकी ३८ राइडर्सने रात्रभर राइड करत रविवारी (दि. १५) सकाळी ७.३० वाजेच्या आत राईड पूर्ण केली. मुंबईचे रँडोनर सायकलिस्ट कबीर राचुरे, डॉ. महेंद्र महाजन यांनी केवळ सात तास १५ मिनिटात ही बीआरएम पूर्ण केली तर भारतीय आर्मीचे भारत पन्नू यांनी सात तास ३० मिनिटात राईड पूर्ण केली. विशेष म्हणजे यात धुळ्याच्या एका जोडप्यासह एकूण ५ महिलांनी सहभाग घेत राईड पूर्ण केली आहे. दोन महिन्यापूर्वी सायकलिंग सुरु करणाºया कल्याणी मोरे, सायकलिस्ट असोसिएशनचे डॉ. महेंद्र महाजन, डॉ. मनीषा रौंदळ, नीता नारंग, पल्लवी पवार, शारदा शितोळे या महिलांनी राईड पूर्ण करत इतर महिला सायकलिस्ट समोर आदर्श ठेवला आहे. नाईट बीआरएम मध्ये सहभागी होणाºयांची संख्या प्रत्येक राईडला वाढत असल्याची नोंद असून नाईट बीआरएम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. हर्शल पवार, नितीन कोतकर आणि डॉ. नितीन रौंदळ यांन संपूर्ण राईड साठी मार्शलिंग केले. संपूर्ण भारतातील बीआरएमशी संलग्न असून फ्रान्समधील जगभरातील ब्रॅव्हट्सची देखरेख करणााºया एसीपीशी संबंधित आहे.

Web Title: 38 cyclists in Nashik City completed the full night BRM ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.