घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरीचा पर्दाफाश ३२ सिलिंडर जप्त : निमसे मळ्यातील अड्ड्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:06 AM2017-12-01T01:06:14+5:302017-12-01T01:07:18+5:30

नांदूर नाका भागातील निमसे मळा शिवारात घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा सुरू असलेला अवैध व्यवसायाचा अड्डा आडगाव व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उद्ध्वस्त केला आहे.

32 cylinders seized in domestic gas cylinders: Police raid on Nimse Mall | घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरीचा पर्दाफाश ३२ सिलिंडर जप्त : निमसे मळ्यातील अड्ड्यावर पोलिसांचा छापा

घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरीचा पर्दाफाश ३२ सिलिंडर जप्त : निमसे मळ्यातील अड्ड्यावर पोलिसांचा छापा

Next
ठळक मुद्देसिलिंडरसह मिनी टेम्पो जप्त यंत्राच्या साहाय्याने गॅस चोरीपावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंचवटी : नांदूर नाका भागातील निमसे मळा शिवारात घरगुती गॅस सिलिंडरच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करण्याचा सुरू असलेला अवैध व्यवसायाचा अड्डा आडगाव व गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उद्ध्वस्त केला आहे. सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी ३२ सिलिंडरसह मिनी टेम्पो जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरु वारी (दि. ३०) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा व आडगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैधरीत्या गॅस चोरीचा अड्डा उद्ध्वस्त केला. आगर टाकळीमधील समतानगर येथील रहिवासी असलेला मुकेश रामभाऊ पाथरे (३३) हा सदर अवैध व्यवसाय करत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, नांदूर नाक्यावरील निमसे मळा परिसरात संशयित पाथरे हा ग्राहकांना वाटप केल्या जाणाºया घरगुती गॅस सिलिंडरमधून यंत्राच्या साहाय्याने गॅस चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी निमसे मळा येथील अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी छोटा हत्ती चारचाकी वाहन (क्र . एमएच १५ डीजे ३८२१) सिलिंडरने भरलेला आढळून आला तसेच घटनास्थळी सिलिंडरमधून गॅस दुसºया सिलिंडरमध्ये भरण्यासाठी लागणारे यंत्रही पोलिसांनी येथून जप्त केले. पोलिसांनी घटनास्थळाहून तब्बल ३२ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर तसेच सिलिंडर वाहतूक करणारे वाहन, यंत्रसामग्री असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित पाथरे याला अटक केली आहे. संशयित हा परिसरातील एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीला आहे; मात्र कोणत्या वितरकाकडे तो क ाम करतो, हे समजू शकले नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संपत लोहकरे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: 32 cylinders seized in domestic gas cylinders: Police raid on Nimse Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.