अभिनवच्या ग्रंथालयासाठी ३०० पुस्तकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 05:45 PM2019-02-10T17:45:59+5:302019-02-10T17:47:04+5:30

सिन्नर : मविप्र संचलित येथील अभिनव बाल विकास ज्ञानसंकुलात निर्माण होत असलेल्या चिमुकल्यांच्या ग्रंथालयासाठी अनेक पुस्तकप्रेमींकडून ३०० पुस्तके भेट देण्यात आली.

 300 book gifts for Abhinav's library | अभिनवच्या ग्रंथालयासाठी ३०० पुस्तकांची भेट

अभिनवच्या ग्रंथालयासाठी ३०० पुस्तकांची भेट

Next

 संस्थेचे संचालक हेमंत वाजे, शालेय समिती सदस्य सूमन खुळे, नगरसेवक सुजाता भगत, संस्थेचे सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी राजाराम मुंगसे, लायन्सचे डॉ. विजय लोहारकर, डॉ. उमेश येवलेकर, मनिष गुजराथी, अर्पणा क्षत्रिय, संजय सानप, शिवाजी ओहोळ, स्वप्नील डुंबर,े पालक व देणगीदार निलेश सोनवणे, रवी उगले, श्रीकांत काळे, शाळेच्या मुख्याध्यापका संगिता आव्हाड, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ आदी मान्यवर उपस्थित होते. अभिनव बाल विकास मंदिरात सुमारे ६५० च्या आसपास विद्यार्थी अध्ययन करत असून या चिमुकल्यांसाठी शालेय पुस्तके व्यतिरिक्त कथा, कादंबरी, मासिके, गोष्टी अशा पुस्तकांची अत्यंत गरज भासत असल्याने त्यासाठी शालेय स्तरावर एक सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत सार्वजनिक वाचानलयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांच्यामार्फत वाचनालयाकडून सुमारे ३०० पुस्तके भेट देण्यात आली. तसेच प्रा. मुंगसे यांच्याकडून पाच हजार रूपये, प्रा. जावेद शेख यांच्याकडून ७ हजार रूपये, युवा फाउंडेशनकडून आठ हजार रूपये किंमतीची पुस्तके भेट दिली. पालक निलेश सोनवणे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पाच हजार रूपयांच्या खेळण्याच्या वस्तू भेट दिल्या. रवी उगले यांनी दोन हजार रूपये व तिसरी व चौथीच्या पालकांनी चार हजार रूपये देणगी दिली. ग्रंथालयासाठी आलेली पुस्तके संस्थेचे संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत, मुख्याध्यापक आव्हाड यांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्यात आले.ग्रंथालयातील पुस्तके हे आमच्यासाठी गौरवाची बाब असून शाळेतील विद्यार्थी हा मोबाईल युगात पुस्तकप्रेमी होईल अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली. एक खूप मोठी वाचनाची चळवळ आम्ही तयार करू. यामुळेच आमच्या शाळेतील विद्यार्थी पुढील ज्ञानदानाचया कार्यात सतत अग्रेसर राहतील अशी ग्वाही प्रास्ताविकात आव्हाड यांनी दिली. यावेळी संजीव गांगुर्डे, संगिता गाडे, सुजोत कुमावत, मिनाक्षी ठाकरे, संतोष जगताप, विकास गिते, सविता दवंगे, सरला वर्पे, संगिता जाधव, संगीता शिंदे, कविता पवार, अर्चना काशिद, रवींद्र बुचकूल, नितेश दातीर, सुरेखा भोर, वैभव केदार, वृषाली खताळ, ज्योती शिंदे आदी उपस्थित होते. वृषाली खताळ यांनी सूत्रसंचालन केले. मिनाक्षी ठाकरे यांनी आभार मानले.

Web Title:  300 book gifts for Abhinav's library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.