द्राक्ष निर्यातीसाठी २७ हजार प्लॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:54 AM2018-12-18T00:54:54+5:302018-12-18T00:55:51+5:30

युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी केली आहे. द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

 27 thousand plots for export of grape | द्राक्ष निर्यातीसाठी २७ हजार प्लॉट

द्राक्ष निर्यातीसाठी २७ हजार प्लॉट

Next

नाशिक : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य राष्ट्रांमध्ये द्राक्षांची निर्यात करण्यासाठी आवश्यक असलेल्या द्राक्ष प्लॉट नोंदणी प्रक्रियेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी केली आहे. द्राक्षबागांची नोंदणी पूर्ण झाली आहे.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अद्याप द्राक्षबागांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही द्राक्षबागांची नोंदणी होण्याचा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. निर्यातक्षम रेसिड्यू फ्री द्राक्षांसाठी कृषी विभागाकडे द्राक्षबागांची नोंदणी आवश्यक असून, यावर्षी १५ आॅक्टोबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत सुमारे २७ हजारांहून अधिक प्लॉटची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ३० हजार ४२७ प्लॉट इतके होते. त्यातुलनेत यावर्षी नोंदणी करणाºया द्राक्ष उत्पादक शेतकºयांचा निर्यातीक डे कल वाढत असून डिसेंबरपर्यंत हे आणखी प्रमाण वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाला आहे. यावर्षी शेतकºयांना ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्षनिर्यातीसाठी त्यांच्या प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातून सुमारे एक लाख दोन हजार ८१६ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. याच प्रमाणात यावर्षीही निर्यातीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार चे पाच हजार प्लॉटची नोंदणी होणे आवश्यक असून, शेतकºयांनी ३१ डिसेंबरपर्यंत द्राक्ष प्लॉटची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कार्यालयाने केले आहे.
प्रत्येक प्लॉटसाठी लागणार शुल्क
द्राक्ष उत्पादक शेतकºयांना त्यांच्या बागेतील द्राक्षांची निर्यात करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील कृषी सहायक यांच्याकडे प्लॉटची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांना द्राक्षबागेचा सातबारा व खाते उतारा व प्रत्येक प्लॉटसाठी ५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

Web Title:  27 thousand plots for export of grape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.