रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:44 PM2018-08-30T16:44:21+5:302018-08-30T16:52:56+5:30

सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला

25 thousand people help from the Rashbihari school for the residents of Kerala | रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत

रासबिहारी शाळेकडून केरळवासीयांसाठी २५ हजाराची मदत

Next
ठळक मुद्देसर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला

नाशिक-‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे केवळ प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित न ठेवता रासबिहारी शाळेने ते केरळ पुरग्रस्तांना मदत करून प्रत्यक्ष कृतीत आणले आहे. केरळमध्ये अतिवृष्टिमुळे आलेल्या पुराच्या पाण्याने जे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्यातुन सावरण्यासाठी सर्व भारतीयांचा सहभाग असणे आवश्यक आहे. याविषयीचे संस्कार आपल्या मुलांवर बालपणापासून असणे आवश्यक आहे हे लक्षात घेवून रासबिहारी शाळेने आपल्या प्रत्येक विद्यार्थी व कर्मचाऱ्याकडून किमान एक रु पया तरी देवून आपला सहभाग नोंदवावा या दृष्टीने आवाहन केले होते. त्यानुसार त्याला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आपापल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा केला. आतापर्यंत २५ हजार रु पये मदतनिधी म्हणून जमा झाला आहे. निधी जमा करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. हा निधी लवकरच केरळवासियांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

Web Title: 25 thousand people help from the Rashbihari school for the residents of Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.