पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:14 AM2018-02-22T01:14:43+5:302018-02-22T01:15:03+5:30

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास दोनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. बंदी असताना प्लॅस्टिक पिशव्या वापरल्याने चार दुकानदारांकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 22 kg plastic bags seized in Panchvati | पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

पंचवटीत २२ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

googlenewsNext

पंचवटी : पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास दोनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. बंदी असताना प्लॅस्टिक पिशव्या वापरल्याने चार दुकानदारांकडून वीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.२०) पंचवटी मनपाच्या आरोग्य विभाग पथकाने दिंडोरीरोड परिसर, बाजार समितीबाहेरील दुकानांत ही कारवाई केली आहे. ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरल्याने त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो, तसेच दरवर्षी पावसाळ्यात या प्लॅस्टिक पिशव्यांमुळे नाले, गटार तुंबत असतात. ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरू नये असे आवाहन मनपाच्या वतीने यापूर्वी करूनही दुकानदार प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात, तर काही प्लॅस्टिक विक्र ेते सर्रासपणे नियमांची पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे.  पंचवटी विभागीय अधिकारी बी. वाय. शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, डी. बी. माळेकर, किरण मारू, दीपक गायकवाड, नरेश नागपुरे, किरण साळवे, राकेश साबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  ऋ षिकेश ट्रेडर्स, दिवानी हार्डवेअर, साइराज कम्युनिकेशन व अभिषेक स्वीट्स या दुकानांत प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title:  22 kg plastic bags seized in Panchvati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.