शहरात ११ महिन्यांत  २१ जळीतकांडाच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:52 AM2018-11-26T00:52:43+5:302018-11-26T00:52:58+5:30

संपूर्ण राज्यात वाहन जाळपोळीचा ‘नाशिक पॅटर्न’ कुप्रसिद्ध असून, शहर पोलीस आयुक्तालयात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधित संशयितांनी २१ वाहनांना आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे़ जाळपोळीच्या बहुतांशी घटना या आपसातील वादाचा काटा काढण्यासाठी तसेच दुसऱ्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान, वाहन जाळपोळीची विकृत मानसिकता बदलण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे़

 21 incidents of burning in 11 months | शहरात ११ महिन्यांत  २१ जळीतकांडाच्या घटना

शहरात ११ महिन्यांत  २१ जळीतकांडाच्या घटना

googlenewsNext

नाशिक : संपूर्ण राज्यात वाहन जाळपोळीचा ‘नाशिक पॅटर्न’ कुप्रसिद्ध असून, शहर पोलीस आयुक्तालयात १ जानेवारी ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधित संशयितांनी २१ वाहनांना आग लावून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे़ जाळपोळीच्या बहुतांशी घटना या आपसातील वादाचा काटा काढण्यासाठी तसेच दुसऱ्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ दरम्यान, वाहन जाळपोळीची विकृत मानसिकता बदलण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे़
शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत संशयितांनी वाहनांना लावलेल्या आगीत सुमारे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़, तर सामाजिक तेढ निर्माण झाल्यानंतर समाजकंटकांनी शहर वाहतुकीच्या एका बसवर पेट्रोलबॉम्ब फेकून जाळण्याचा प्रयत्न केला होता़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहन जाळपोळीचे (आग लावून अपक्रिया) २१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये १४ दुचाकी, तीन चारचाकी, तीन रिक्षा व एका बसची जाळपोळ करण्यात आली आहे़
गत आठवड्यात अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दोन रिक्षांचे सीट जाळण्यात आले, तर पूर्वीच्या भांडणातून महालक्ष्मी चाळ येथील घरातील पलंगास आग लावण्यात आल्याची घटना घडली होती़ काही वर्षांपूर्वी सिडकोतील टिप्पर गँगने वाहनांची जाळपोळ करून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता़

Web Title:  21 incidents of burning in 11 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.