मराठा समाजासाठी २ हजार ५६९ जागा राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:16 AM2019-06-29T01:16:29+5:302019-06-29T01:16:47+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेतही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा निश्चित झाल्या असून, नाशिकमधील १६४ महाविद्यालांमध्ये सुमारे दोन हजार ५६९ जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी राखीव असून,

 2 thousand 569 seats reserved for Maratha community | मराठा समाजासाठी २ हजार ५६९ जागा राखीव

मराठा समाजासाठी २ हजार ५६९ जागा राखीव

Next


नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मंजुरी दिल्यानंतर अकरावी प्रवेशप्रक्रियेतही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जागा निश्चित झाल्या असून, नाशिकमधील १६४ महाविद्यालांमध्ये सुमारे दोन हजार ५६९ जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, आर्थिक दुर्बल घटकांती विद्यार्थ्यांसाठी दोन हजार १५० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्र ीयेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रातील १४६ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २३ हजार ८६० जागांसाठी आतापर्यंत २६ हजार ३६० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, २१ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरला आहे. यात मराठा आरक्षणाच्या (एसईबीसी) प्रवर्गातील केवळ १५३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाप्रमाणे अकरावीची प्रवेशप्रक्रिया वादात अडकण्याची भीती असल्याने त्यांनी याप्रवर्गातून अर्ज करणे टाळल्याची शक्यता लक्षात घेऊन आॅनलाइन अर्जांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत कला शाखेसाठी तीन हजार ११९ वाणिज्यसाठी आठ हजार ८६०, तर विज्ञानसाठी नऊ हजार ४१९ अर्ज प्राप्त झाले असून, एमसीव्हीसीसाठी केवळ ३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये आयसीएसई बोर्डातून उत्तीर्ण झालेल्या ५६३, तर सीबीएसई बोर्डाच्या ६३२ विद्यार्थ्यांनी अर्ज आले आहे. प्रवेशप्रक्रियेत या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहे, तर एसएसी बोर्डाच्या २४ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी भाग एक व २० हजार ३५१ विद्यार्थ्यांनी भाग दोन भरला आहे.
सुधारित वेळापत्रक असे
च्प्रथम फेरी
४ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करणे.
५ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी.
६ व ८ जुलैपर्यंत हरकती नोंदविणे.
१२ जुलैला पहिली गुणवत्ता यादी.
१३ ते १६ जुलैला प्रवेश निश्चित करणे.
च्दुसरी फेरी
१६ जुलैला दुसऱ्या यादीसाठी उपलब्ध जागांची माहिती.
१७ व १८ जुलैला अर्जाच्या भाग १, २ मध्ये बदल करणे.
२२ जुलैला दुसरी गुणवत्ता यादी.
२३ ते २५ जुलैला प्रवेश निश्चित करणे.
च्तिसरी फेरी
२५ जुलैला तिसºया यादीसाठीच्या जागांची माहिती.
२७ ते २९ जुलैला अर्जाच्या भाग १, २ मध्ये बदल करणे.
१ आॅगस्टला तिसरी गुणवत्ता यादी.
२ ते ५ आॅगस्टला प्रवेश निश्चित करणे.
च्विशेष फेरी
५ आॅगस्टला विशेष गुणवत्ता यादीसाठीच्या जागा समजणार
६ व ७ आॅगस्टला अर्जात बदल करणे.
९ आॅगस्टला विशेष गुणवत्ता यादी.
१० ते १३ आॅगस्ट प्रवेश निश्चित करणे.

Web Title:  2 thousand 569 seats reserved for Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.