१९ मुस्लीम उमेदवारांनी अजमावले नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:47 AM2019-04-19T00:47:07+5:302019-04-19T00:47:50+5:30

धुळे लोेकसभा मतदार-संघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघात प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतविभागणीसाठी मुस्लीम  उमेदवार देण्यात आले तर काही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून चाचपणी केल्याचा इतिहास आहे.

19 Muslim candidates have lost hope | १९ मुस्लीम उमेदवारांनी अजमावले नशीब

१९ मुस्लीम उमेदवारांनी अजमावले नशीब

Next

मालेगाव : धुळे लोेकसभा मतदार-संघातील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्राबल्य असल्याने या मतदारसंघात प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतविभागणीसाठी मुस्लीम  उमेदवार देण्यात आले तर काही पक्षांनी आपापले उमेदवार उभे करून चाचपणी केल्याचा इतिहास आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात २००९पासून मालेगाव मध्य आणि बाह्य असे दोन विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आले. त्यानंतर मालेगावच्या एकगठ्ठा मुस्लीम मतांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा राहिला आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्वच उमेदवारांनी त्यासाठी मुस्लीम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असूनही आतापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात एकही मुस्लीम उमेदवार निवडून आलेला नाही. केवळ मुस्लीम मतांच्या भरवशावर धुळे लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत विविध पक्षांतर्फे १९ मुस्लीम उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले. त्यात कुणाला पाडण्याचे तर कुणाला मदत करण्याचे काम केले आहे. सर्वात आधी १९९१ मध्ये ज्यावेळी मालेगाव बाह्य आणि मध्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदार-संघाला जोडलेले नव्हते त्यावेळी नाशिक जिल्ह्यातून केवळ बागलाण आणि कळवण तालुका जोडलेला होता.
२०१४मध्ये आम आदमी पक्षातर्फे अन्सारी निहाल अहमद मोहंमद हारुण, समाजवादी पक्षातर्फे निहाल अहमद अब्दुल रहेमान दानेवाला, अ.वि. पार्टीतर्फे महेमूद भाईजान, वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियातर्फे शेख मुख्तार अहमद मोहंमद कासीम, अपक्ष म्हणून अब्दुल हमीद शेख हबीब, मो. इस्माईल जुम्मन, गाझी ऐतजाद मुबीनखान, जाफर बापूजी पठाण, पिंजारी जैनुद्दीन हुसेन, सय्यद मोहंमद कय्युम, सय्यद सलीम सय्यद अलीम यांनी उमेदवारी केली होती.
२००९मध्ये जनता दलातर्फे निहाल अहमद मौलवी मोहंमद उस्मान, बसपातर्फे रिजवान मो. अकबर अपक्ष गाझी अजहर अहमद मुबीन अहमद खान, भारतीय अल्प सुरक्षा महासंघातर्फे अन्सारी मोहंमद इस्माईल मोहंमद इब्राहीम, आणि नवभारत निर्माण पक्षातर्फे अरीफ अहमद शेख जाफर यांनी उमेदवारी केली होती.
२००९ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येऊन मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले. मालेगाव मध्य मतदारसंघात २००९ मध्ये दोन लाख २६ हजार ३१ इतके मुस्लीम मतदार होते. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर प्रथमच विविध पक्षांतर्फे सहा मुस्लीम उमेदवार मैदानात उतरविण्यात आले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त म्हणजे ११ मुस्लीम उमेदवार विविध पक्षांतर्फे मैदानात उतरविण्यात आले.
१९९१मध्ये अहमद खान मोहंमद खान मरदान हे एकमेव मुस्लीम उमेदवार अपक्ष उभे होते. त्यावेळी त्यांना ६९९ इतकी मते पडली होती. त्यावेळी मालेगाव मध्य किंवा मालेगाव बाह्य हे विधानसभा मतदारसंघ जोडण्यात आलेले नव्हते. त्यावेळी कॉँग्रेसचे बापू हरी चौरे हे खासदार म्हणून निवडून आले होते.

Web Title: 19 Muslim candidates have lost hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.