शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:24 AM2018-04-20T00:24:03+5:302018-04-20T00:24:03+5:30

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.

15 lakhs of farmers are tired | शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकºयांमध्ये खळबळबाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या


येवला : कांदा उत्पादकांचा संताप, शुक्र वारपासून आमरण उपोषण
 

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील या कांदा व्यापाºयाकडे फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल परिसरातील शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. या व्यापाºयाने मालाचे पैसे रोख न देता ५० शेतकºयांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित शेतकºयांचे धनादेश न वटल्यामुळे त्यांनी कांदा व्यापाºयाकडे धाव घेतल्यानंतर व्यापाºयाने भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकººयांनी केली आहे. हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रश्नावर शेतकºयांनी उपोषणाचे हत्यार उपासले आहे. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस १३ रोजी पत्र लिहून हा विषय गांभीर्याने घेण्याचे कळविले होते. तसेच १७ पर्यंत सर्व शेतकºयांचे पैसे द्यावेत. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. पैसे मिळावेत म्हणून शेतकºयांनी शुक्रवार २० एप्रिलपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणास संपत आहेर, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे, जगन्नाथ एंडाईत आदीसह शेतकरी बसणार आहे.
सूर्यभान माधवराव गायकवाड या शेतकºयाला दिलेला धनादेश माघारी आला आहे. त्यांनी बाजार समितीसह प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
शेतकºयांमध्ये खळबळअंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकºयांचे सुमारे १५ लाख रु पयांचे धनादेश वटलेले नाही. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या आहेत. पैसे थकवल्यामुळे त्या दोन व्यापाºयांचा परवानादेखील रद्द केला आहे. शिवाय येवला सहायक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांनी याबाबत विचारणा केली आहे. बाजार समिती आता शेतकºयांचे पेमेंट रोखीने देत आहे. रोख पेमेंट सुरु झाल्यामुळे आता पैसे थकवण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. सुमारे ५५० कोटी रु पये रक्कम कांदा उत्पादक शेतकºयांना रोख देण्यात आले आहे. सुमारे अर्धा टक्का रक्कम थकली हे मान्य आहे. ३० एप्रिलपर्यंत पेमेंट देण्याचे त्या दोन व्यापाºयांनी कबूल केले आहे.
उषाताई शिंदे, सभापती, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती शेतमाल विक्र ीवर कमिशन घेते. त्यामुळे पैसे देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परवानाधारक व्यापाºयाकडून बँक सॉलव्हन्सी, सातबारा उताºयावर बाजार समितीचे नाव लावून घेण्याची जिल्ह्यातील अन्य सात बाजार समितीमधील पद्धत येवला बाजार समितीने अवलंबावी.
दीपक पाटोदकर,
सामाजिक कार्यकर्ता

Web Title: 15 lakhs of farmers are tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.