13 villages, including Wadangali, will get water supply scheme | वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजनेला मिळणार 
वडांगळीसह १३ गाव पाणीपुरवठा योजनेला मिळणार 

सिन्नर : वडांगळीसह १३ गाव पाणी पुरवठा योजनेचा जलसाठा हा मोठया प्रमाणावर असूनही खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे फीडरसाठी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी सादर केलेल्या ३५ लाख रूपयांच्या निधीस जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे योजनेतील गावांना एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडीतपणे पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनी सांगितले.
सदर योजनेस एक्सप्रेस फिडरद्वारे वीज पुरवठा केल्यास सर्व गावांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येईल, त्यासाठी लागणाºया निधीची तरतूद जिल्हा नियोजनमधून करावी, अशी मागणी दि. ९ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली होती.
वडांगळी सह १३ गाव पाणी पुरवठा योजनेला कडवा कालव्यातून थेट पाणी पुरवठा होतो. कडवाद्वारे हे योजनेच्या वडांगळी येथील २५ एकराच्या तलावात सोडले जाते. एवढया मोठया प्रमाणावरील जलसाठा असताना देखील वीजेच्या सततच्या निर्माण होणाºया अडथळयांमुळे कमी काळ वीज पुरवठा होतो. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत या गावांना सुरळीत पाणी पुरवठा करणे अवघड होऊन बसले आहे. ही बाब ओळखून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना सदर कोकाटे यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या ३५ लाख रूपायांच्या एक्सप्रेस फिडरच्या प्रस्तावाला निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

Web Title: 13 villages, including Wadangali, will get water supply scheme
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

चिकलठाण्यात ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

चिकलठाण्यात ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

2 hours ago

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद 

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद 

2 hours ago

राष्ट्रीय पेयजल योजना : सिंधुदुर्ग जिल्ह्यात  दहा कोटी रुपये अद्यापही अखर्चित

राष्ट्रीय पेयजल योजना : सिंधुदुर्ग जिल्ह्यात  दहा कोटी रुपये अद्यापही अखर्चित

7 hours ago

परभणी : ‘जायकवाडी’च्या पाण्याने दुष्काळी भागाला तारले

परभणी : ‘जायकवाडी’च्या पाण्याने दुष्काळी भागाला तारले

21 hours ago

उस्मानाबाद जिल्ह्यात ९२ हजार ग्रामस्थांना ४५ टँकरचा आधार

उस्मानाबाद जिल्ह्यात ९२ हजार ग्रामस्थांना ४५ टँकरचा आधार

1 day ago

पाणी मिळाले नाहीतर बेमूदत उपोषण

पाणी मिळाले नाहीतर बेमूदत उपोषण

1 day ago

प्रमोटेड बातम्या

नाशिक अधिक बातम्या

मतदार ओळखपत्रांचे उमराणे येथे वाटप

मतदार ओळखपत्रांचे उमराणे येथे वाटप

3 hours ago

दोनवाडेकरांनी अनुभवली पट्ठे बापूरावांच्या लावणीची अदाकारी

दोनवाडेकरांनी अनुभवली पट्ठे बापूरावांच्या लावणीची अदाकारी

3 hours ago

ग्रामस्थांना युवकांनाकडून मोफत पाणीपुरवठा

ग्रामस्थांना युवकांनाकडून मोफत पाणीपुरवठा

3 hours ago

वडाळा गावातून तलवार बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक

वडाळा गावातून तलवार बाळगणाऱ्यास पोलिसांकडून अटक

4 hours ago

वार्षिक स्नेहसंमेलनात माता-पित्यांचा सत्कार

वार्षिक स्नेहसंमेलनात माता-पित्यांचा सत्कार

4 hours ago

अखेर त्या कारचालकावर गुन्हा दाखल

अखेर त्या कारचालकावर गुन्हा दाखल

5 hours ago