नंदुरबारात छेडखानीवरून युवकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:09 AM2018-10-16T11:09:32+5:302018-10-16T11:09:36+5:30

नंदुरबार : युवकाविरुद्धही विनयभंगाचा गुन्हा दाखल

Yudas beat breathlessly at Nandurbar | नंदुरबारात छेडखानीवरून युवकास बेदम मारहाण

नंदुरबारात छेडखानीवरून युवकास बेदम मारहाण

Next

नंदुरबार : बहिणीची छेड काढल्याच्या रागातून चौघांनी युवकास बेदम मारहाण करीत त्याला चालत्या बसखाली फेकण्याचा प्रय} केल्याची घटना नंदुरबारात धुळेनाका परिसरात घडली. याच प्रकरणी मारहाण झालेल्या युवकाविरुद्धही मुलीची छेडछाड व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
धुळे चौफुली परिसरात राहणारा राजू दिनेश मंगळे (18) या युवकाने विक्की भोई, रा.गवळीवाडा या युवकाच्या बहिणीची छेड काढल्याचा आरोप करीत त्याला जाब विचारला. त्यातून विक्की भोई व इतर तिघांनी त्याला धुळेनाका परिसरातील संत गोरोबा कुंभार चौकात गाठून बेदम मारहाण केली. दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर त्याला चालत्या बसखाली फेकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू मंगळे याच्या फिर्यादीवरून विक्की भोई, कृष्णा व इतर दोनजण अशांविरुद्ध शहर पोलिसात जिवे ठार मारण्याचा प्रय} केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुनील बि:हाडे करीत आहे.
दरम्यान, याच प्रकरणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जखमी राज दिनेश मंगळे या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
खोडाईमाता यात्रेत 13 रोजी अल्पवयीन मुलगी फिरत असतांना तिच्याशी लगट करून विनयभंग केला. यापूर्वीही अर्थात गेल्या दोन महिन्यांपासून अल्पवयीन मुलीला त्रास देत असल्याचे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत राज दिनेश मंगळे, रा.हनुमान हिल, धुळे चौफुली याच्याविरुद्ध शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक योगिता पाटील करीत आहे.
 

Web Title: Yudas beat breathlessly at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.