उमराणीचे युवक सरसावले जलसंधारणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:32 PM2018-11-19T12:32:31+5:302018-11-19T12:32:36+5:30

20 फुट लांबीचा माती बंधारा : युवकांचा उत्स्फुर्त सहभाग

The young man of the month has come for water conservation | उमराणीचे युवक सरसावले जलसंधारणासाठी

उमराणीचे युवक सरसावले जलसंधारणासाठी

Next

मोदलपाडा : धडगांव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील उमराणी ब्रुद्रूक येथील पाणीटंचाई निवारण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवासह जलसंधारणासाठी ग्रामस्थ व युवा वर्गाच्या मदतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. त्यानुसार उमराणी खुर्द येथील नदीत 20 फुट  लांबीचा व दोन फुट उंचीचा माती बंधारा बांधण्यात आला. 
गावातील युवांनी या उपक्रमातुन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. आदिवासी नवनिर्माण सेना व आदिवासी युवा एकता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा वनराई बंधारा बांधण्यात आला. या वनराई बंधा:यात साठलेल्या पाण्यामुळे शेतक:यांना लाभ होवून पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच जनावरांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार असून, त्याअनुषंगाने या बंधा:याचे काम करण्यात आले. गावातील चेतन पावरा यांच्या पुढाकाराने हा बंधारा बांधण्यात आला़  या बांधा:यासाठी लागणा:या रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या व इतर साहित्य युवाकांनी उपलब्ध केले होते. हा बंधारा बांधण्यासाठी 100 सिमेंटच्या पिशव्या वापरण्यात आल्या़. 
उमराणी गावात हा पहिला वनराई बंधारा बांधण्यात आला असून, या अभिनव उपक्रमाचे  ग्रामस्थांनी कौतुक केले आह़े. समाजातील विविध घटकांनी भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या गावात जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता नाल्यातून जातो. परंतु अद्यापर्पयत या मार्गावर फरशी पुल बांधण्यात आलेला नाही व गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी वाहने नाल्यातूनच काढावी लागतात. या मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची डबके साचत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर पाण्याची डबकी साचू नये यासाठी वनराई बंधा:याचे काम केले. 
दरम्यान ग्रामस्थांनी बांधलेल्या या वनराई बंधा:याची प्रशासनाने दखल घेवून या मार्गावरील नाल्यावर त्वरित फरशीपूल बांधून ग्रामस्थ व वाहनधारकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या बंधा:यासाठी ग्रामस्थ व युवा वर्गासह  प्रा.बटेसिंग पावरा, राजू पावरा, विक्रम पावरा, राजेंद्र पावरा,दिलीप पावरा, अमर पावरा, वसंत पावरा, किसन पावरा, दिनेश पावरा, रामचंद्र पावरा, संजय पावरा, सुनील पावरा, हर्षल पावरा, संदीप पावरा, हेमंत पावरा, रितेश पावरा, नितीन पावरा, दीपक पावरा, कमलेश पावरा, ईश्वर पावरा, कैलास पावरा आदी युवकांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: The young man of the month has come for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.