तळोदा येथील यात्रोत्सव : 3 दिवसात 800 बैलांची खरेदी-विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:29 PM2018-04-21T13:29:46+5:302018-04-21T13:29:46+5:30

कोटीच्या उलाढालीनंतरही बैलबाजारात घसरण

The Yatra at Taloda: 800 days of buying and selling of 800 bulls | तळोदा येथील यात्रोत्सव : 3 दिवसात 800 बैलांची खरेदी-विक्री

तळोदा येथील यात्रोत्सव : 3 दिवसात 800 बैलांची खरेदी-विक्री

Next

लोकमत ऑनलाईन
तळोदा, दि़ 21 : शहरात कालिकामाता यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या बैलबाजारात गेल्या 3 दिवसात 800 बैलांची खरेदी विक्री होऊन 1 कोटीची उलाढाल झाली आह़े या मोठय़ा उलाढालीनंतरही बैलबाजार सुरू राहण्याऐवजी बंद होण्याची वेळ आली आह़े  
सालाबादाप्रमाणे यंदाही तळोदा बाजार समितीच्यावतीने मार्केट यार्डात भरवण्यात आला होता़ गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बाजारात सातपुडय़ाच्या दुर्गम व अतीदुर्गम भागातील बैलांसह गुजरात आणि मध्यप्रदेशातील बैल विक्रीसाठी घेऊन आले होत़े यातून पहिल्या दिवशी बैलबाजारात 1 हजार 200 बैलांची आवक झाली होती़ गेल्या दोन दिवसात 600 तर शुक्रवारी आठवडे बाजार आणि यात्रोत्सव असा एकत्र बाजारामुळे 800  बैलांची खरेदी विक्री करण्यात आली होती़ यातून आर्थिक उलाढाल होऊन बाजार समितीकडेही महसूल जमा झाला होता़ बैलबाजारानिमित्त इतर पूरक व्यावसायिकांनीही याठिकाणी हजेरी लावली होती़ मात्र बैलबाजार आटोपल्याने या व्यावसायिकांच्या व्यवसायांवरही गदा येणार आह़े दरवर्षी किमान 8 ते 10 दिवस चालणा:या बैलबाजाराने कोटी रूपयांचा टप्पा ओलांडूनही निर्माण झालेल्या समस्येवर बाजार समितीने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े 
बाजाराच्या यशस्वीतेसाठी सहायक सचिव हेमंत चौधरी, प्रसाद बैकर, अजय चव्हाण, जयेश सूर्यवंशी, राहुल जावरे, धनराज मराठे, संदीप उदासी, निलेश राजका, कृष्णा मराठे यांनी परिश्रम घेतल़े गेल्या दोन तळोदा बैल बाजारात 1 हजार 300 बैलांची आवक झाली होती़ गुजरात, मध्यप्रदेशासह धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावठी व ठेलारी प्रजातीच्या बैल याठिकाणी दाखल झाले होत़े यातून 600 बैलांची विक्री करण्यात आली़ यातून 75 लाख रूपयांची उलाढाल झाली होती़ यात ब्रिजलाल गुणा रावताळे रा़राणीपूर ता़ शहादा यांची बैलजोडी ओल्या झांबळे रा़ बेटावद ता़ शिंदखेडा यांनी 52 हजार रूपयात खरेदी केली़ बाजारात गेल्या दोन दिवसातील सर्वाधिक दर रावताळे यांच्या बैलजोडीला मिळाल़े 
शुक्रवारी तळोदा येथे बाजार असल्याने जळगाव, धुळे जिल्ह्यासह गुजरात राज्यातून बैल खरेदीदार आले होत़े या खरेदीदारांकडून 200 बैलांची खरेदी करण्यात आली़ यातून एकत्रितरित्या 1 कोटी रूपयांची उलाढाल झाली आह़े सकाळपासून खरेदीदार शेतकरी आणि बाहेरगावाहून आलेले व्यापारी बैलांचे परीक्षण करत होत़े प्रामुख्याने सातपुडय़ातील गावठी बैलजोडय़ांना सर्वाधिक पसंती देण्यात येत होती़ बैलबाजारात गत दोन दिवसात उलाढाल झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये उत्साह होता़ परंतू दिवसभरात बैलांचे खरेदी विक्री झाली असली तरी दर न वाढल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली़ यंदा गुजरात राज्यातील मोठे व्यापारी बाजारात आले नसल्याने उलाढाल मंदावल्याचे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: The Yatra at Taloda: 800 days of buying and selling of 800 bulls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.