वीज मनोरे उभारण्यासाठी कामगारांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:18 AM2019-07-19T11:18:24+5:302019-07-19T11:18:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा ते धडगाव रस्त्यालगत अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.     ...

Worker's work to build power-tower | वीज मनोरे उभारण्यासाठी कामगारांची कसरत

वीज मनोरे उभारण्यासाठी कामगारांची कसरत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा ते धडगाव रस्त्यालगत अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.        या वीज वाहिनीसाठी मनोरे  उभारण्यात येत असून याठिकाणी  काम करण्यासाठी पश्चिम बंगालमधून कारागीर आले आहेत. उंच मनो:यावर झुल्याद्वारे जाऊन           वीज वाहिनी टाकण्याच्या कामासाठी या कारागिरांकडून होणारी कसरत पाहून आबालवृद्ध थक्क होत आहेत.
तळोदा तालुक्यातील तळोदा ते धडगाव रस्त्यालगत सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून   132 के.व्ही. डी.सी.डी.सी. तळोदा-धडगाव लाईन 132 के.व्ही.  धडगाव उपकेंद्रासाठी वीज वाहिनी टाकण्यात येत आहे. या उपकेंद्रासाठी अतिउच्च दाब वाहिनीसाठी उंच मनोरे उभारणे व  वीज तारा टाकण्याचा प्रकल्प सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगालमधून कामगार मागविण्यात आले आहेत. हे काम एवढय़ा उंच मनो:यावर व तारांवर झुल्यांमध्ये स्वार होऊन कसरत करीत कामे करण्यात येत आहेत. त्यांचे कौशल्य पासून आबालवृद्ध थक्क होत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी होत असलेली कसरत पाहून सर्वाचेच मन हेलावते.
या वीज वाहिनीचे काम करीत असताना मनोरा बांधकामामुळे बाधित होणा:या जागेची संबंधितांना नुकसान भरपाई मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून मूल्यमापन करून मनोरा उभारला जाणा:या जागेवरील पिकांची व फळझाडांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम सुरू असताना परिसरातील शेतकरीही मोठय़ा प्रमाणावर शेतशिवारात गर्दी करीत असल्याचे दिसते. हा प्रकल्प तळोदा ते धडगाव दरम्यानच्या जनतेसाठी सोयीचा असल्याचे   बोलले जात असून शेतक:यांकडून कंपनीला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे.
 

Web Title: Worker's work to build power-tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.