राऊतपाडय़ाची अंगणवाडी भरते झाडाखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:16 PM2019-06-24T12:16:45+5:302019-06-24T12:16:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठीचा राऊतपाडा येथील अंगणवाडीची इमारत पडकी झाल्याने अंगणवाडीत येणा:या मुलांना गेल्या दोन-तीन ...

Under the tree, the anganwadi of Rautpadayi fills the tree | राऊतपाडय़ाची अंगणवाडी भरते झाडाखाली

राऊतपाडय़ाची अंगणवाडी भरते झाडाखाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठीचा राऊतपाडा येथील अंगणवाडीची इमारत पडकी झाल्याने अंगणवाडीत येणा:या मुलांना गेल्या दोन-तीन वर्षापासून झाडाखाली बसवून शिक्षण दिले जात आहे. मंदीरपाडा येथे समाज मंदिरात व बारीनिबीपाडा येथील पाडय़ातील ग्रामस्थांच्या घरांत अंगणवाडीच्या मुलांना इमारतीअभावी शिक्षण दिले जात आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या काठीच्या राऊतपाडा, मंदीरपाडा व बारीनिबीपाडा येथे अंगणवाडी इमारतीअभावी मुलांना जागा  नसल्याने गैरसोयीचे ठरत आहे. काठीच्या राऊतपाडय़ात अंगणवाडीची इमारत पडकी झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षापासून झाडाखाली मुलांना बसवून शिक्षण दिले जात आहे. या पाडय़ाची 500 लोकसंख्या आहे. मंदिरपाडा           येथील 460 च्या दरम्यान           लोकसंख्या आहे. येथे इमारत नसल्याने गेल्या चार वर्षापासून  समाज मंदिरात मुलांना शिक्षण             दिले जात आहे तर बारीनिबीपाडाची 500 लोकसंख्या असून या पाडय़ात गेल्या दहा वर्षापासून ग्रामस्थांच्या घरात अंगणवाडी चालविली जात आहे. 
या पाडय़ांवर अंगणवाडीच्या मुलांना बसण्यासाठी इमारत नसल्याने विद्याथ्र्याना झाडाखाली बसवावे लागत आहे. दरम्यान, संबंधित ग्रामपंचायत अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. त्यामुळे या अंगणवाडीसाठी इमारत बांधण्याची मागणी काठीच्या सरपंच स्नेहा पाडवी यांनी केली आहे. संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरित अंगणवाडी इमारत बांधकामासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांपुढे विधानसभा निवडणुकांचे आव्हान
 

Web Title: Under the tree, the anganwadi of Rautpadayi fills the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.