नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:40 PM2019-02-16T12:40:56+5:302019-02-16T12:41:02+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत आजाराला कंटाळून महिला व पुरुषाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार व बिजरीगव्हाण, ...

Two suicides in different incidents in Nandurbar | नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

नंदुरबारात वेगवेगळ्या घटनेत दोघांची आत्महत्या

Next

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत आजाराला कंटाळून महिला व पुरुषाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नंदुरबार व बिजरीगव्हाण, ता.अक्कलकुवा येथे घडली. 
नंदुरबारातील मेहतरवाडा भागात राहणारे अमरदिप मनोहर चाबरिया (35) यांना पोटाचा आजार होता. त्यावर त्यांचा रुग्णालयात उपचार देखील सुरू होता. परंतु वारंवारच्या   या आजाराला कंटाळून अमरदिप  यांनी मेहतरवाडय़ातील आपल्या घरातच साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. नंदुरबार शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार चव्हाण करीत आहे.
दुसरी घटना बिजरीगव्हाण, ता.अक्कलकुवा येथे घडली. ममता सामा तडवी (21) या गेल्या काही दिवसांपासून थंडी-तापाने आजारी होत्या. या आजाराला कंटाळून त्यांनी गावशिवाराच्या जंगलातील आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. गावक:यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर पोलिसांना कळविले.
याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी मोलगी पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक पाटील करीत आहे.     

Web Title: Two suicides in different incidents in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.