ट्रक-ट्रॉलाच्या धडकेत चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:46 AM2019-07-15T10:46:42+5:302019-07-15T10:46:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर सोमावलनजीक शनिवारी रात्री ट्रक व ट्रॉला यांचा समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ...

Truck-Trawler kills driver | ट्रक-ट्रॉलाच्या धडकेत चालक ठार

ट्रक-ट्रॉलाच्या धडकेत चालक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर सोमावलनजीक शनिवारी रात्री ट्रक व ट्रॉला यांचा समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर सुरू असणारी अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून दिवसाआड एकाचा बळी जात आहे.
कांदे भरून धुळ्याहून अंकलेश्वरकडे जात असलेली ट्रकला (क्रमांक एमएच 18 एम 5517) नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील सोमावल ते मोदलपाडा दरम्यान असणा:या नळगव्हाण फाट्याजवळ समोरून येणा:या ट्रालाने (क्रमांक आरजे 27 जीए 9308) जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक चालक अब्दुल शेख युसूफ शिकलीकर हा व ट्रॉलाचालक  गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोन्ही जखमींना रुग्णवाहिकामधून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
ट्रॉला चालकाला पुढील उपचारासाठी नंदूरबार येथिल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मृत झालेल्या ट्रॉला चालकांची संध्याकाळी सात वाजेपयर्ंत ओळख पटलेली नव्हती. त्याच्या ओळख पाठविण्याचे प्रय} सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत ट्रक चालक अब्दुल शेख युसूफ शिकलीकर याने दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार किसन वळवी करीत आहे.
दरम्यान, या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना जायबंदी व्हावे लागले आहे. 
 

Web Title: Truck-Trawler kills driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.