शिक्षक-शिक्षिकांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:46 PM2019-07-22T12:46:58+5:302019-07-22T12:47:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा ते शिरपूर रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ...

Teachers and teachers have done work on the road pavement | शिक्षक-शिक्षिकांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले

शिक्षक-शिक्षिकांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा ते शिरपूर रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे फेस, ता.शहादा येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिकांनी स्वयंस्फूर्तीने खड्डे बुजविले.
बामखेडा ते फेस फाटा दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. मात्र संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे फेस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षिकांनी स्वयंस्फूर्तीने या खड्डय़ांमध्ये दगड-गोटे, माती टाकून ते बुजवले. त्यासाठी कैलास पाटील, युवराज पाटील, संजय सोनवणे, हेमंत कोते, मंजुश्री पाटील, गायत्री पाटील यांनी श्रमदान केले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत असून संबंधित विभागाने रस्ता दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांनी केली आहे.
 

Web Title: Teachers and teachers have done work on the road pavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.