Taloda premises: get the workers involved. | तळोदा परिसर : उसतोड कामगार मिळेना.

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, तळवे, मोड, बोरद परिसरात उसतोड सुरु आह़े परंतु उसतोड मजुरांची मोठय़ा संख्येने टंचाई जाणवत असल्याने येथील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आह़े 
तळोदा तालुक्यातील उसपट्टा म्हटला जाणारा बोरद, मोड, रांझणी, प्रतापपूर, तळवे आदी परिसरात उसतोड मजुरांची समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े मजुरांची टंचाई त्यातच साखर कारखाने, खांडसरी यांच्याकडून ठराविक शेतकरी वगळता इतर शेतक:यांच्या उसतोडीकडे दुर्लक्ष करण्यात येत आह़े येथील अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखाने, खांडसरी, गु:हाळ यांच्याकडे ऊसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े 
तळोदा तालुका हा जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रमाणात ऊस उत्पादन करणारा असून गेल्या वर्षी या तालुक्याने स्थानिक कारखाने, खांडसरी, गु:हाळ यांना मोठय़ा प्रमाणावर आपला ऊस देऊन गळीत हंगाम यशस्वी केला होता़ परंतु काही शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी गुजरात राज्यातील काही कारखाने, खांडसरींना ऊस दिला होता़ त्यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतक:यांनी बाहेर ऊस दिला होता, त्यांच्या उसाला स्थानिक कारखाने तसेच खांडसरीकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे काही शेतक:यांचे म्हणणे आह़े 
काही शेतक:यांकडून उसतोड कामगारांचे मुकडदम, सुपरवायझर यांना दोन पैसे जास्त देऊन तोड लावून घेण्याची विनंतीही करण्यात येत आह़े  परंतु तरीही संबंधित सुपरवाझर ‘भाव’ खात असल्याचे सांगण्यात येत आह़े कारखानदार तसेच खांडस:यांकडून अल्पभूधारकांची पिळवणूक करण्यात येत आह़े 
अल्पभूधारक ऊस उत्पादक शेतक:यांच्या क्षेत्रावरील  उसतोड वगळण्यात येऊन मोठय़ा ऊस उत्पादक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसतोड सर्वप्रथम करण्यात येत  आह़े