तळोदा पालिकेला गाळे लिलावातून 62 लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 01:03 PM2018-03-21T13:03:10+5:302018-03-21T13:49:34+5:30

तळोदा पालिका : 38 पैकी 34 गाळ्यांचा झाला लिलाव

Taloda municipality earns 62 lakhs from the auction | तळोदा पालिकेला गाळे लिलावातून 62 लाखांचे उत्पन्न

तळोदा पालिकेला गाळे लिलावातून 62 लाखांचे उत्पन्न

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
तळोदा, दि़ 21 : येथील पालिकेच्या व्यापारी संकुलातील 34 गाळ्यांचा लिलाव बोली पध्दतीने मंगळवारी महसूल प्रशासनाच्या उपस्थित करण्यात आला़ सर्वाधिक किंमत गाळा क्रमांक 108 ला मिळाली़ साधारण तीन लाख 85 हजार रुपयांना हा गाळा गेला़ तर सर्वाधिक कमी किंमत गाळा 95 ला मिळाली़ 99 हजार 500 रुपयात त्याची बोली लावण्यात आली़ 
दरम्यान, या गाळ्यांच्या लिलावातून तळोदा पालिकेला जवळपास 62 लाखांचे उत्पन्न मिळाले आह़े तळोदा पालिकेने आपल्या हद्दीतील आठवडे बाजारात चार संकुले उभारली आहेत़ त्यात 117 गाळ्यांची संख्या आह़े 
पैकी मंगळवारी 38 गाळ्यांचा लिलाव  करण्याचे नियोजन पालिकेने केले होत़े त्यानुसार सकाळी 11 वाजता तहसीलदार योगेश चंद्रे व पालिकेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या यांच्या उपस्थितीत लिलावाची बोली पध्दत लावण्यात आली़ इच्छूक व्यावसायिकांना टोकण क्रमांक देण्यात आला होता़ सर्वात जास्त बोली गाळा क्रमांक 108 ला लागली होती़ हा गाळा 3 लाख 85 हजार रुपयांना गेला़ तर सर्वात कमी बोली गाळा क्रमांक 95 ला लागली़ 99 हजार 500 रुपयांना हा गाळा गेला़ सरासरी दीड लाखार्पयत या गाळ्यांची बोली लागली होती़ सदर व्यापारी गाळ्यांच्या माध्यमातून तळोदा नगरपालिकेस साधारणत 62 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आह़े सदर रक्कम तीन वर्षार्पयत पालिकेकडे नापरतावा म्हणून राहणार आह़े त्यानंतर पालिका 10 टक्के भाडेवाढ करु शकत़े 38 पैकी 34 गाळ्यांचा लिलाव झाला आह़े तर चार गाळे अजूनही शिल्लक राहिले आहेत़ पालिकेने यापूर्वीच इच्छूक व्यावसायिकांकडून 30 हजार रुपये अनामत रक्कम घेतली आह़े गाळ्यांच्या लिलाव ऐकण्यासाठी पालिकेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ 
पालिका गाळ्यांचा लिलावासाठी पालिकेचे कार्यालय अधिक्षक राजेंद्र सैदाणे, मिळकत व्यवस्थापक विजय सोनवणे, लिपीक मोहन माळी, अश्विन परदेशी, राजेंद्र परदेशी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतल़े पालिकेने व्यापारी गाळ्यांसाठी अनुसूचित जाती,जमातीच्या व्यावसायिकांचादेखील  विचार करण्याची मागणी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी प्रशासनाकडे केली होती़ मात्र त्यांच्या मागणीचा विचार गाळे लिलाव प्रक्रियेत झालेला दिसून येत नाही़ कारण केवळ अपंगांसाठीच व तोही एकच गाळा आरक्षीत करण्यात आला आह़े गाळ्यांची पूर्ण प्रक्रिया झाल्यामुळे आरक्षण काढता येवू शकत नाही़ अशी सबब पालिकेने सांगितली असली तरी, जे गाळी शिल्लक राहिले आहेत त्यात प्रामुख्याने या प्रवर्गाच्या विचार करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आह़े या शिवाय नापरतावा अनामतसाठी पालिकेने जी रक्कम आकारली आहेत त्यातही सर्वसामान्य व्यावसायिकांचा विचार करण्यात यावा कारण एवढी रक्कम त्यांना भरणे अशक्य आह़े त्यामुळे प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आह़े 
पालिकेने आपल्या मालकीच्या व्यापारी संकुलातील 34 गाळ्यांचा लिलाव केला असला तरी ही गाळे घेऊन त्यात पोटभाडेकरु ठेवण्याचा प्रकार सर्रास केला जात असल्याने पोटभाडेकरु पध्दतीला पालिकेने आवर घालण्याची आश्यकता आह़े कारण संबंधित माल पोटभोडकरु ठेवून प्रचंड पैसा कमावित असतो़ त्यामुळे यावर ठोस कार्यवाही करण्याची गरज आह़े शिवाय शहरातील गरजू तरुणांना रोजगार देण्याचा पालिकेचा उद्देश असतो़ त्यालाच तिलांजली दिली जात असत़े याशिवाय गाळ्यांमध्ये अवैध व्यवसाय चालणार नाही याकडेही पालिकेने दक्ष राहण्याची आवश्यकता आह़े 
 

Web Title: Taloda municipality earns 62 lakhs from the auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.