सारंगखेडा थांब्यावर बसचा दीड तास खोंळबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:21 AM2019-07-19T11:21:25+5:302019-07-19T11:21:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : यंदा देऊर, टेंभा व खैरवे येथील विद्यार्थी संख्या वाढल्याने एकाच बसने सर्व विद्यार्थी जाणे ...

Take a half-an hour bus stop at Sarangkheda | सारंगखेडा थांब्यावर बसचा दीड तास खोंळबा

सारंगखेडा थांब्यावर बसचा दीड तास खोंळबा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : यंदा देऊर, टेंभा व खैरवे येथील विद्यार्थी संख्या वाढल्याने एकाच बसने सर्व विद्यार्थी जाणे शक्य नसल्याने बुधवारी संध्याकाळी सारंगखेडा बसथांब्यावर विद्यार्थी बसमध्ये बसण्यावरून दीड ते दोन तास खोळंबा चालला. या बसमध्ये अक्षरश: चेंगराचेंगरी होत होती.    
शहादा तालुक्यातील देऊर, टेंभा व खैरवे येथील विद्यार्थी शिक्षणासाठी सारंगखेडा व शहादा येथे प्रवास करतात. विद्यार्थी संख्या जास्त तर बस मात्र एकच. पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने बसच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यात दाटीवाटीने घुसतात. यामुळे विद्याथ्र्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. बसमध्ये चढताना किंवा उतरताना अनेकदा विद्याथ्र्यामध्ये वाद विकोपाला जातात ते टाळण्यासाठी अतिरिक्त बस सुरू होणे आवश्यक आहे. 60 सीट क्षमता असणा:या बसमध्ये 130 विद्यार्थी कसे बसतील. शाळा सुटल्यानंतर  संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेदरम्यान विद्याथ्र्याची गर्दी सारंगखेडा बसथांब्यावर जमून बसची वाट पाहतात. घरी पोहोचण्याच्या घाईने विद्याथ्र्याची  बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी होते. त्यामुळे अपघात व वाद  विकोप्याला जातात. होणारे वाद व शाळा-महाविद्यालयाच्या वेळेचे भान ठेवून अप्रिय घटना घडण्यापूर्वीच शहादा आगार प्रमुखांनी लक्ष घालून विद्याथ्र्याच्या शिक्षणाबरोबरच जीवाचाही विचार करुन जादा बसेस सुरू करुन विद्याथ्र्यांचे होणारे हाल कमी करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. अनेकदा  बसमध्ये जागा नसल्याने विद्याथ्र्याना रात्री उशिरार्पयत बसथांब्यावर ताटकळत रहावे लागते. 
बुधवारी सायंकाळी बसमध्ये बसण्यावरून असाच वाद होऊन या बसचा दीड ते दोन तास खोळंबा झाला. चालक-वाहक व सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मध्यस्थीने शहादा आगार प्रमुखांना दूरध्वनीवरून कळवून दुसरी बस मागवून या विद्याथ्र्याना रवाना करण्यात आले. याबाबत शहादा आगार प्रमुखांनी गंभीर दखल घेऊन या मार्गावर विद्याथ्र्याच्या सोयीनुसार जादा बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी विद्याथ्र्यासह देऊर, टेंभा व खैरवे येथील पालकांकडून  करण्यात आली आहे.
 

Web Title: Take a half-an hour bus stop at Sarangkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.