बोरद परिसरातील पुराच्या पाण्यात पेरलेले बियाणे गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:38 PM2017-07-23T18:38:46+5:302017-07-23T18:38:46+5:30

तळोदा तालुक्यातील स्थिती : बोरद परिसरातील गावांमध्ये शिरले पुराचे पाणी

The seeds sown in the full water of Borod area have been carried | बोरद परिसरातील पुराच्या पाण्यात पेरलेले बियाणे गेले वाहून

बोरद परिसरातील पुराच्या पाण्यात पेरलेले बियाणे गेले वाहून

Next
लाईन लोकमतबोरद,दि.23 - सातपुडय़ाच्या दुर्गम भागात कोसळत असलेल्या पावसामुळे निझरा नदीसह नाल्यांना पूर आला आह़े या पुराचे पाणी शेतशिवारात आणि गावांमध्ये शिरल्याने बोरद परिसरात नुकसान झाले आह़े शुक्रवारपासून बोरद परिसरातील 10 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आह़े तळोदा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आह़े शनिवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे निझरा नदीला पूर आला होता़ या पुराचे पाणी बोरद, मोड, खेडले या गावांमध्ये नदीकाठावर असलेल्या घरांमध्ये तसेच शेतशिवारात शिरले होत़े सायंकाळी पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने पेरणी केलेले कापूस, मका, ज्वारी, सोयाबीन बियाणे जमिनीसह वाहून गेल्याचे प्रकार रविवारी सकाळी समोर आले आहेत़ यामुळे शेतक:यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून तालुका प्रशासनाने तात्काळ दखल घेतली होती़ तहसीलदार योगेश चंद्रे यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन शेतशिवाराचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत़

Web Title: The seeds sown in the full water of Borod area have been carried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.